-
बॉलीवूडच्या प्रेमकहाणींपैकी एक म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर यांचीही कहाणी.
-
दोघांनी २००८ मध्ये टशन या चित्रपटात काम केले होते.
-
त्यादरम्यान दोघेही प्रेमात पडले.
-
या चित्रपटात त्यांच्यासोबत अक्षय कुमारही होता.
-
अक्षय कुमारला जेव्हा करीना आणि सैफच्या अफेअरची माहिती मिळाली तेव्हा त्याने सैफला समजावलं.
-
याचा खुलासा खुद्द करीना कपूरने केला आहे.
-
आमच्या दोघांमधील मैत्रीबद्दल अक्षयने सैफला इशारा दिला होता, असं करीनाने सांगितलं.
-
एका मुलाखतीत ट्विंकल खन्नासोबत बोलताना करिनाने तिच्या आणि सैफच्या नात्याबद्दल सांगितले.
-
ज्यामध्ये तिने त्यांच्या रोमान्सबद्दल अक्षयची प्रतिक्रिया काय होती हे देखील सांगितले.
-
करीनाने सांगितले की, जेव्हा अक्षयला याबद्दल संशय आला तेव्हा त्याने सैफला एका कोपऱ्यात नेले.
-
जिथे त्याने सैफला सांगितले की, “ऐक, सावध राहा. ही मुलगी आणि तिचं कुटुंब खतरनाक आहेत. त्यांच्याशी पंगा घेऊ नकोस.”
-
ज्यावर सैफ म्हणाला होता, की “मी त्यांना ओळखतो, मी सांभाळून घेईल.”
-
करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी २००८ मध्ये पहिल्यांदा एकमेकांसोबत काम केले होते.
-
यानंतर दोघेही एजंट विनोद, कुर्बान यांसारख्या चित्रपटात एकत्र दिसले.
-
दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली.
-
त्यांना फिल्म इंडस्ट्रीचं पॉवर कपलही म्हटलं जातं.
-
दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले. त्यानंतर २०१६ मध्ये करिनाने तैमूर अली खानला जन्म दिला.
-
यानंतर, २०२१ मध्ये, करीना आणि सैफच्या घरी दुसरा मुलगा जन्मला.
-
दिवंगत अभिनेता इरफान खान याच्या शेवटच्या थिएटरमध्ये रिलीज झालेल्या अँग्रेझी मीडियममध्ये करीना शेवटची दिसली होती. (फोटो – सोशल मीडिया, इंडियन एक्सप्रेस)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स