-
अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिची लेक पलक तिवारी यांची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.
-
अनेकदा या मायलेकी त्यांचे व्हिडीओ, फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. त्यामुळे श्वेतासोबतच पलकची लोकप्रियतादेखील दिवसेंदिवस वाढत आहे.
-
पलक बऱ्याच वेळा तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोमुळे चर्चेत असते. नुकतंच पलकने एका बोल्ड फोटोशूट केले आहे. त्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
पलक तिवारीने शॉर्ट बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. त्यासोबत तिने पांढऱ्या रंगाचा ब्लेजर घालून छान फोटोशूट केले आहे.
-
पलकने हे फोटो शेअर करत त्याला ‘अ विंटर रोझ (A Winter Rose)’ असे हटके कॅप्शन दिले आहे.
-
पलक तिवारीच्या या फोटोवर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहे. तिचे अनेक चाहते तिच्या फोटोखाली हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
बॉलिवूड अभिनेता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी हिने पलकच्या फोटोंवर कमेंट केली आहे. ‘खूपच सुंदर’, असे तिने म्हटले आहे.
-
या फोटोशूटदरम्यान पलकने छान डायमंडचे इअररिंग्स परिधान केले आहेत. याची किंमत १९०० रुपये आहे.
-
यासोबत पलकने न्यूड शेडमध्ये मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहे.
-
तिचा हा बोल्ड आणि हॉट लूक पाहून अनेक चाहते घायाळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. (सर्व फोटो – पलक तिवारी/ इन्स्टाग्राम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…