-
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचं आज निधन झालं. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा घेतला.
-
बप्पी लहरी यांच्यामुळे भारतीयांना डिस्को गाण्यांची ओळख झाली.
-
त्यांच्या निधनावर चाहत्यांकडून सोशल मीडियावरुन शोक व्यक्त केला जात आहे.
-
बप्पीदांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ साली पश्चिम बंगालमध्ये झाला.
-
अलोकेश लहरी हे त्यांचं मूळ नाव होतं.
-
वयाच्या २१ व्या वर्षापासून ते बॉलिवूडमधील चित्रपटांना संगीत देऊ लागले.
-
१९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाला संगीत देत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.
-
मात्र १९७६ साली आलेल्या ‘चलते-चलते’ या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली.
-
बप्पीदांनी ‘नमक हलाल’, ‘शराबी’, ‘हिम्मतवाला’, ‘साहेब’, ‘गुरू’, ‘घायल’, ‘रंगबाज’ या चित्रपटांनाही संगीत दिलं.
-
त्यांना गाण्यांबरोबरच कपडे आणि सोन्याच्या दागिण्यांबद्दल विशेष आवड होती.
-
बप्पी लहिरींनी त्यांच्या गाण्यांनी अनेकांची मने तर जिंकलीच पण त्याचसोबत त्यांचे सोन्यावरील प्रेम हे देखील सर्वांसाठी कुतुहलाचा विषय ठरायचा.
-
त्यांच्याकडे गणपती, कृष्णा, बालाजी या देवतांचे लॉकेट असलेल्या चैन होत्या.
-
बप्पी लहरींकडे असलेल्या प्रत्येक सोन्याच्या दागिन्यांविषयी खास आठवण त्यांच्याकडे होती.
-
सोन्याची विशेष आवड असणाऱ्या बप्पीदांकडे सोन्याचा टी सेट देखील होता.
-
गेल्याच वर्षी दिवाळीत धनोत्रयोदशीला त्यांच्या पत्नीने हा सेट त्यांना भेट स्वरूपात दिला होता.
-
सोन्याचे भरपूर दागिने असल्याने बप्पीदांनी खास सोन्याचा टी सेट त्यांच्या पत्नीकडे मागितला होता.
-
“माझ्याकडे सोन्याचे बरेच दागिने आहेत. त्यामुळे या वेळी चैन न घेता सोन्याचा टी सेट घेऊया”, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.
-
म्हणूनच धनोत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर बप्पीदांच्या पत्नीने त्यांच्यासाठी हा खास सोन्याचा टी सेट विकत घेतला होता.
-
सोन्याच्या दागिन्यांविषयी त्यांना विशेष प्रेम होतं.
-
आपल्यासाठी सोनं खूप लकी आहे, असं ते मानायचे.
-
(सर्व फोटो : बप्पी लहरी/ फेसबुक)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित