-
ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांची मुलगी आणि श्रिया पिळगावकरला मिर्झापूर वेब सीरिजमुळे प्रसिद्धी मिळाली.
-
पण त्यापूर्वी तिने शाहरुखसोबत एका चित्रपटात काम केले होते.
-
अभिनयासोबतच श्रियामध्ये अनेक कलागुणही दडलेले आहेत. चला तर मग आज जाणून घेऊया श्रियाच्या टॅलेंटबद्दल..
-
श्रियाला ५ भाषा येतात. जपानी, फ्रेंच या दोन परदेशी भाषांशिवाय ती इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतही पारंगत आहे.
-
श्रिया ही एक प्रोफेशनल जलतरणपटू देखील आहे. तिला डान्स आणि गाण्यातही रस आहे.
-
श्रियाचा पहिला चित्रपट फॅन होता, ज्यामध्ये ती शाहरुखच्या सोबत दिसली होती.
-
श्रिया तिच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावी, यासाठी तिची आई आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर तिला एकटीला प्रवास करायला लावायच्या.
-
श्रिया सध्या अनेक वेब सीरिजमध्ये काम करत आहे. या वर्षी तिच्या सहा वेब सिरीज रिलीज होणार आहेत.
-
श्रिया म्हणते की एकाच आयुष्यात कधीकधी RAW एजंट, फॉरेन्सिक तज्ञ, रिपोर्टर आणि वकील बनून आपल्याला अनेक भूमिका जगता येतात, हाच अभिनयाचा सर्वोत्तम भाग आहे.
-
श्रियाला गोड खायला खूप आवडतं. ती मध्यरात्री उठून गोड पदार्थ खात असते.
-
श्रिया ही तिचे वडील सचिन यांची जबरा फॅन आहे.
-
( सर्व फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख