-
‘सेक्रेड गेम्स’ वेब सीरिज मालिकेने नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घातला होता. या वेब सीरिजमध्ये राजश्री देशपांडे मुख्य भूमिकेत होती आणि तिने या मालिकेत खूप बोल्ड सीन्स दिले होते.
-
तिच्या या बोल्ड सीन्सची एक क्लिप पॉर्न साइटवर पोहोचली होती. त्यानंतर राजश्रीला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला होता. याचा खुलासा खुद्द राजश्रीने नुकताच एका मुलाखतीत केला आहे.
-
स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत राजश्रीने सांगितले की, नवाजुद्दीनसोबत बोल्ड सीन्स दिल्यानंतर तिला लोकांकडून अश्लील मेसेज येऊ लागले होते.
-
राजश्रीने तिच्या एका सीनबद्दल सांगितले होते. जेव्हा तिला एका सीनमध्ये तिच्या ब्लाउजची बटणे काढायची होती, हा सीन खूप कठीण होता, असं ती सांगते.
-
राजश्री म्हणाली, की लोक तिचे बोल्ड सीन व्हॉट्सअॅपवर एकमेकांना पाठवतील याची तिला फारशी कल्पना नव्हती आणि ती त्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष करत होती.
-
राजश्रीने म्हणाली की, सीरिजमध्ये दिलेले न्यूड सीन जेव्हा पॉर्न साइटवर जाऊ लागले तेव्हा अडचणी वाढल्या आणि यामुळे लोक तिला पॉर्न अभिनेत्री समजू लागले.
-
राजश्रीने सांगितले की, सीन करताना इतक्या अडचणी आल्या नव्हत्या, जेवढ्या हे व्हिडीओ व्हायरल झाल्याने आल्या. मात्र कालांतराने ती या सगळ्यातून बाहेर आली.
-
राजश्रीने म्हणाली की, सीन करताना मला दिग्दर्शक अनुराग कश्यपवर पूर्ण विश्वास होता. अनुरागने तिला सांगितले होते की, सीन करताना काही अडचण असेल तर लगेच सांग.
-
राजश्रीने सांगितले की अनेक वेळा तिला अशा समस्यांचा सामना करावा लागला होता.(फोटो – सोशल मीडिया)

पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ