-
लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ‘पावनखिंड’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.
-
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराजअष्टक’ सीरिजमधील हा तिसरा चित्रपट १८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आला आहे.
-
शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानावर आधारित या चित्रपटात प्राजक्ताने श्रीमंत रायाजीराव बांदल यांच्या पत्नी श्रीमंत भवानीबाई बांदल यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.
-
‘पावनखिंड’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
-
पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाचे शो हाउसफुल होत आहेत.
-
या चित्रपटातील कलाकारांनी साकारलेल्या भूमिकांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
-
प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवरून खास पोस्ट शेअर केली आहे.
-
“पावनखिंड चित्रपटाला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल आभार मानायला शब्द अपूरे पडत आहेत. मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आले.”, असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.
-
‘पावनखिंड’ चित्रपटातील प्राजक्ताचा लूक.
-
प्राजक्ताचा नऊवारी साडीत मराठमोळा साजशृंगार.
-
‘पावनखिंड’ चित्रपटाच्या प्रमोशनानिमित्त प्राजक्ताने केलेला नथीचा नखरा.
-
(सर्व फोटो : प्राजक्ता माळी/ इन्स्टाग्राम)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”