-
युरोप आणि रशियामध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीची सर्वत्र चर्चा आहे. संपूर्ण जगाचं लक्ष युरोप आणि रशियाकडे लागून राहिले आहे.
-
याचनिमित्ताने जाणून घेऊया हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलेल्या युक्रेनियन अभिनेत्री नतालिया कोझीनोवाबद्दल.
-
अभिनेत्री नतालिया कोझीनोवा मूळची युक्रेनची असून तिच्याकडे युक्रेनचं नागरिकत्व आहे.
-
नतालियाने अनेक बॉलिवूड चित्रपटांत काम केलं आहे.
-
२०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘अतिथी तुम कब जाओगे’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
अजय देवगण आणि काजोलची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात नतालिया पाहुणी कलाकार म्हणून दिसली होती.
-
नतालिया ‘अंजुना बीच’, ‘लव्ह वर्सेस गँगस्टर’, ‘तेरे जिस्म से जान तक’ या चित्रपटांत मुख्य भूमिकेत होती.
-
याशिवाय ‘सुपर मॉडेल’, ‘बोले इंडिया जय भीम’ या हिंदी चित्रपटांतही तिने काम केलं आहे.
-
अल्ट बालाजीवरील ‘गंदी बात’ या वेब सीरिजच्या चौथ्या सीझनमध्ये नतालिया बोल्ड सीन देताना दिसली होती.
-
‘गंदी बात’ या वेब सीरीजमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.
-
नतालिया टॅटूप्रेमी आहे.
-
तिने शरिरावरील अनेक भागांवर टॅटू काढले आहेत.
-
नटालियाच्या हातावर डॉल्फिनचा टॅटू आहे.
-
२०१५ साली पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचा टॅटू पाठीवर काढल्यामुळे नतालिया चर्चेचा विषय बनली होती.
-
भारत-अमेरिकेमधील संबंध सुधारत असल्याचा आनंद तिने या टॅटूद्वारे व्यक्त केला होता.
-
लवकरच नतालिया ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे.
-
या चित्रपटात अभिनेता अर्जुन रामपालसोबत ती स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
-
नतालियाने चित्रपटांसोबतच हिंदी आणि पंजाबी गाण्यांच्या अल्बममध्ये सुद्धा काम केलं आहे.
-
नतालियाचा ‘भानुमती’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
यात ती ‘भानुमती’ हे मुख्य पात्र साकारताना दिसेल.
-
(सर्व फोटो : नतालिया कोझीनोवा/ इन्स्टाग्राम)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती