-
‘देवयानी’ या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री शिवानी सुर्वे हे नाव आता कोणत्याही प्रेक्षकाला नवीन नाही.
-
‘बिग बॉस मराठी २’मध्ये सहभागी झालेली शिवानी पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिली होती.
-
सध्या शिवानी तिच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
अभिनेत्री शिवानी सुर्वे अजिंक्य ननावरे या तरुणाला डेट करतेय.
-
अजिंक्य ननावरे एक उत्तम अभिनेता आहे.
-
‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘सख्या रे’, ‘गर्ल्स हॉस्टेल’ यासारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये अजिंक्यने काम केले आहे.
-
‘पावनखिंड’ चित्रपट हा नुकताच प्रदर्शित झाला आहे.
-
लेखक – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी संकल्पित केलेल्या आठ चित्रपटांपैंकी हा तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
‘पावनखिंड’ या चित्रपटात अजिंक्यने ‘नरवीर शिवा काशीद’ ही भूमिका साकारली आहे.
-
मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी पावनखिंडीत दिलेल्या लढ्यावर आधारित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.
-
काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ने बॉक्स ऑफिसवर धमाका करत आपण कुठेच कमी नसल्याचं दाखवून दिलं.
-
शिवानी आणि अंजिक्यने ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेत एकत्र काम केले होते.
-
दरम्यान त्या दोघांमध्ये चांगली मैत्री जमली आणि त्याच काळात ते दोघे ऐकमेकांच्या प्रेमात पडले.
-
सोशल मीडियावर सक्रिय असणारी ही जोडी नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत असते.
-
‘देवयानी’, ‘सुंदर माझं घर’, ‘तू जिवाला गुंतवावे’ या मराठी मालिकांनंतर हिंदी मालिकांकडे वळलेल्या शिवानीचे अनेक चाहते आहेत.
-
शिवानीच्या लोकप्रियतेमध्ये आता कमालीची वाढ झाली आहे.
-
शिवानी सुर्वे हिने मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्ये अभिनेय केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सुर्वे, अजिंक्य ननावरे / इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”