-
बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट २५ फेब्रुवारीला सगळीकडे प्रदर्शित झाला. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु होती. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
मुंबईतील कमाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
वास्तविक जीवनातील गँगस्टर आणि माफियांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये बनवले गेले आहेत.
-
६० ते ७०च्या दशकात मुंबईत सक्रिय असणारा माफिया म्हणजे हाजी मस्तान. (फोटो : आयएमडीबी)
-
हाजी मस्तानच्या जीवनावर आधारित ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ हा बॉलिवूड चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला होता. (फोटो : आयएमडीबी)
-
अभिनेता अजय देवगण या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. (फोटो : आयएमडीबी)
-
तर दाऊदची भूमिका इमरान हाशमीने साकारली होती. (फोटो : आयएमडीबी)
-
२०१३ साली या सिनेमाचा सिक्वेल देखील प्रदर्शित करण्यात आला होता. (फोटो : आयएमडीबी)
-
‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ असं या चित्रपटाचं नाव होतं. (फोटो : आयएमडीबी)
-
हाजी मस्तानचा शिष्य म्हणून ओळखला जाणारा माफिया म्हणजे दाऊद इब्राहिम. (फोटो : आयएमडीबी)
-
दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर मुंबईतील नागपाडा या भागाची गॉडमदर म्हणून ओळखली जायची. (फोटो : आयएमडीबी)
-
अंडरवर्ल्डच्या सानिध्यात वाढलेल्या हसीनाच्या जीवनपटलावर २०१७ साली ‘हसीना पारकर’ हा चित्रपट आला होता. (फोटो : आयएमडीबी)
-
या चित्रपटात श्रद्धा कपूर हसीना पारकरच्या तर सिद्धार्थ कपूर दाऊदच्या भूमिकेत होता. (फोटो : आयएमडीबी)
-
बॉलिवूडमधील ‘शूटआऊट अॅट वडाळा’ हा चित्रपट मुंबईचा माफिया किंग म्हणून ओळखला जाणाऱ्या मन्या सुर्वेच्या जीवनावर आधारित आहे. (फोटो : आयएमडीबी)
-
‘डोंगरी टू दुबई’ या पुस्तकावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. (फोटो : आयएमडीबी)
-
अभिनेता जॉन अब्राहमने या चित्रपटात मन्या सुर्वेची भूमिका साकारली आहे. (फोटो : आयएमडीबी)
-
राम गोपाळ वर्मा दिग्दर्शित ‘वीरप्पन’ हा चित्रपट दक्षिण भारतात एकेकाळी सक्रिय असणाऱ्या कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनवर आधारित आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ राज्यात दहशत निर्माण करणाऱ्या वीरप्पनच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
संदीप भारद्वाज या चित्रपटात वीरप्पनच्या भूमिकेत आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
१९९४ साली प्रदर्शित झालेला ‘बंदीत क्वीन’ हा चित्रपट फुलनदेवीच्या जीवनपटलावर आधारित आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
चंबळच्या खोऱ्यावर हुकमत गाजवणारी दरोडेखोर ते संसदभवनात देशहिताची शपथ घेणारी खासदार असा फुलनदेवी यांचा प्रवास सगळ्यांनाच थक्क करून सोडणारा आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
त्यांच्या जीवनप्रवासावरील ‘इंडियाज बंदीत क्वीन : फुलनदेवी’ या पुस्तकावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश