-
रविवारी २७ फेब्रुवारीला अभिनेत्री कंगना राणावत हिने तिचा नवा रिअॅलिटी शो ‘Lock Upp’ धुमधडाक्यात लॉंच केला. या शोमध्ये १३ कलाकारांनी सहभाग नोंदवला आहे.
-
२७ फेब्रुवारीपासून, अल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेअर यांनी त्यांच्या संबंधित प्लॅटफॉर्मवर २४ तास या रिअॅलिटी शोचे लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू केले आहे आणि प्रेक्षकांना स्पर्धकांशी थेट संवाद साधण्याची परवानगी देखील दिली आहे.
-
‘Lock Upp’ मध्ये मुन्नावर फारुकी, चक्रपाणी महाराज ते पुनम पांडे यांच्यासह इतर १० कलाकार कोणते आहेत ते जाणून घेऊया.
-
‘दंगल’ मध्ये सान्या मल्होत्राने बबिता फोगाट भूमिका साकारली होती. बबिता यांनी २०१४ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णासह आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारतासाठी विविध पदके जिंकली आहेत. (Photo : Babita Phogat/Instagram)
-
मुनव्वर फारुकी या स्टॅन्ड-अप कॉमेडियनला आपल्या एका शोमध्ये धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपामुळे २०२१ मध्ये तुरुंगात टाकण्यात आले होते. तेव्हापासून तो चर्चेत आहे. यानंतर २ महिन्यातच त्याचे १२ शो रद्द झाले होते. (Photo : Munawar Faruqui/Instagram)
-
निशा रावलने तिचा माजी पती आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता करण मेहरा याच्यावर २०२१ मध्ये घरगुती हिंसाचार आणि विवाहबाह्य संबंधाचा आरोप केल्यापासून ती वादात सापडली आहे. (Photo : Nisha Rawal/Instagram)
-
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारी चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेत्री पायल रोहतगी ‘बिग बॉस २’ मध्ये स्पर्धक होती. तिने ‘कॉर्पोरेट’, ‘प्लॅन’ आणि ‘दिल कबड्डी’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Photo : Payal Rohatgi/Instagram)
-
‘नशा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी वादग्रस्त मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे रिअॅलिटी शोमध्ये ग्लॅमर वाढवणार आहे. ती सोशल मीडियावर बोल्ड फोटो पोस्ट करून लक्ष वेधून घेणे पसंत करते. (Photo : Poonam Pandey/Instagram)
-
डिझायनर साईशा शिंदे, जी पूर्वी स्वप्नील शिंदे होती, ती २०२१ मध्ये ट्रान्सवुमन म्हणून समोर आल्यापासून चर्चेत आहे. गेल्या वर्षभरापासून तिने तिच्या सोशल मीडिया पोस्ट आणि मुलाखतीत तिच्या संघर्षांबद्दल सांगितले आहे. (Photo : Saisha Shinde/Instagram)
-
स्वामी चक्रपाणी महाराज यांनी २०२० साली कोरोना बरा करण्याच्या दाव्यासह ‘गोमूत्र पार्टी’चे आयोजन केले होते. या रिअॅलिटी शोमधील ते काय डावपेच आखणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. (Photo : Swami Chakrapani/Twitter)
-
‘बिग बॉस ४’ मध्ये सहभागी झालेली लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री सारा खान देखील ‘लॉक अप’मध्ये दिसणार आहे. तिने २०१० मध्ये बिग बॉसच्या घरात प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अली मर्चंटशी लग्न केले, परंतु नंतर २०११ मध्ये दोन महिन्यांनी घटस्फोट घेतला. (Photo : Sara Khan/Instagram)
-
‘एमटीव्ही स्प्लिट्सविला’च्या मागील सीझनमध्ये उपविजेता ठरलेल्या शिवम शर्माने आपल्या शायरीने सर्वांनाच त्रास दिला. आपल्या वर्तनामुळे तो इतर सहभागींना मोठा त्रास देऊ शकतो. (Photo : Shivam Sharma/Instagram)
-
‘एमटीव्ही स्प्लिट्सव्हीला’ आणि ‘एमटीव्ही बिग एफ’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये दिसल्यानंतर सिद्धार्थने अल्ट बालाजीच्या ‘पंच बीट’ या वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिका साकारली. सिद्धार्थ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. (Photo : Siddharth Sharma/Instagram)
-
तेहसीन पूनावाला, जो पूर्वी ‘बिग बॉस १३’ मध्ये दिसला होता, तो स्वतःची एक उद्यम भांडवलदार, मानवतावादी, टेड-एक्स स्पीकर आणि राजकीय विश्लेषक म्हणून ओळख करून देतो. त्याच्या राजकीय वक्तव्यांमुळे शोमध्ये वाद निर्माण होऊ शकतो. (Photo : Tahseen Poonawalla/Instagram)
-
‘बिग बॉस १२’ मधील टॉप पाच स्पर्धकांपैकी एक असलेल्या करणवीर बोहरानेही कंगनाच्या शोमध्ये प्रवेश केला आहे. तो ‘नच बलिये’, ‘झलक दिखला जा’ आणि ‘फिअर फॅक्टर’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्येही दिसला आहे. (Photo : Karanvir Bohra/Instagram)
-
अंजली अरोरा ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून तिचे इंस्टाग्रामवर १० मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. हे कंगना राणावतच्या फॉलोवर्सपेक्षाही अधिक आहेत. (Photo : Anjali Arora/Instagram)

Shani Gochar 2025: शनीच्या साडेसाती आणि ढैय्येपासून ५ राशींना मिळणार सुटका, करिअरमध्ये घेणार मोठी झेप, वर्षभर होईल पैशांचा पाऊस