-
स्टार प्लस वाहिनीवर सुरु झालेल्या ‘स्मार्ट जोडी’ या रिअॅलिटी शोची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. (फोटो सौजन्य : स्टार प्लस / इन्स्टाग्राम)
-
या शो दरम्यानचा अभिनेत्री अंकिता लोखंडेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे / इन्स्टाग्राम)
-
‘स्मार्ट जोडी’ हा रिअॅलिटी शो दर रविवारी स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित होणार असून २६ फेब्रुवारीला या शोचा पहिला भाग प्रदर्शित झाला. (फोटो सौजन्य : स्टार प्लस / इन्स्टाग्राम)
-
या शोमध्ये खऱ्या आयुष्यात पती-पत्नी असणाऱ्या सेलिब्रिटी दहा जोड्या सहभागी झाल्या आहेत. (फोटो सौजन्य : स्टार प्लस / इन्स्टाग्राम)
-
सहभागी झालेल्या जोड्यांची ओळख पहिल्या भागात करून देण्यात आली. (फोटो सौजन्य : स्टार प्लस / इन्स्टाग्राम)
-
नुकतंच लग्न झालेले अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन ही लोकप्रिय जोडी या शोमध्ये दिसणार आहे. (फोटो सौजन्य : स्टार प्लस / इन्स्टाग्राम)
-
लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री आणि हिमालया यांनीही या शो मध्ये सहभाग घेतला आहे. (फोटो सौजन्य : स्टार प्लस / इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री मोनालिसा तिचा पती विक्रांत सिंगसोबत ‘स्मार्ट जोडी’ मध्ये दिसणार आहे. (फोटो सौजन्य : मोनालिसा / इन्स्टाग्राम)
-
अभिनेता अर्जुन बिजलानी पत्नी नेहा स्वामीसोबत शोमध्ये सहभागी झाला आहे. (फोटो सौजन्य : अर्जुन बिजलानी / इन्स्टाग्राम)
-
तर राहुल महाजन पत्नी नतालियासोबत शोमध्ये दिसणार आहे. (फोटो सौजन्य : राहुल महाजन / इन्स्टाग्राम)
-
यासोबतच निल भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा, पल्लवी शुक्ला आणि अंकित तिवारी, गौरव तनेजा आणि रितू राठी, बलराज सायल आणि दीप्ती तुली, श्रीकांत आणि विद्या या जोड्याही ‘स्मार्ट जोडी’ शोमध्ये सहभागी झाल्या आहेत. (फोटो सौजन्य : स्टार प्लस / इन्स्टाग्राम)
-
‘स्मार्ट जोडी’ या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन अभिनेता मनीष पॉल करणार आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
-
प्रत्येक जोडीला या शोमध्ये टास्क देण्यात येणार आहेत. टास्क पूर्ण करणारी जोडी शोमध्ये पुढे जाईल. (फोटो सौजन्य : स्टार प्लस / इन्स्टाग्राम)
-
आपल्या जोडीदाराच्या मदतीने या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना टास्क पूर्ण करून विजेतेपदापर्यंत पोहोचायचे आहे. (फोटो सौजन्य : स्टार प्लस / इन्स्टाग्राम)
-
जोडीदारावरील विश्वास, प्रेम, निष्ठा या सगळ्यांचीच या शोमध्ये कसोटी लागणार आहे. (फोटो सौजन्य : अर्जुन बिजलानी / इन्स्टाग्राम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…