-
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. बॉबीचा ‘लव्ह हॉस्टेल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. बॉबीच्या दमदार अभिनयाच कौतुक करण्यात येत आहे.
-
काही वर्षांपूर्वी बॉबीने अपयशाचा सामना केला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बॉबीने त्यांच्या नैराश्ये विषयी सांगितले आहे. यासोबतच त्याने घराणेशाही आणि चुकीच्या निर्णयांबाबतही अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
-
बॉबीने नुकतीच ‘स्पॉटबॉय’ला मुलाखत दिली. यावेळी त्याने नैराश्य आणि चुकीच्या निर्णयांवर वक्तव्य केलं आहे. “मी भाग्यवान आहे की माझा जन्म माझ्या आई-वडिलांच्या घरी झाला. मी हे कुटुंब निवडलं नाही, माझा जन्म इथे झाला आणि यात माझी चूक नाही,” असे बॉबी म्हणाला.
-
पुढे बॉबी म्हणाला, “मला विश्वास आहे की एखादी व्यक्ती ही चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या कुटुंबातील असो किंवा बाहेरील असो, जर प्रेक्षकांना तुम्हाला पाहायचे नसेल तर ते पाहणार नाहीत. जेव्हा मी माझ्या करिअरला सुरुवात केली तेव्हा लोकांना मला पडद्यावर पाहायला आवडले आणि म्हणून मला काम मिळू लागलं.”
-
पुढे या विषयी आणखी काही गोष्टी सांगत बॉबी म्हणाला, “माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी मला प्रेम दिलं, नाही तर मला लगेच काम मिळालं नसतं. मला कामं मिळत राहिलं. मी एका पाठोपाठ हिट एक दिले.”
-
पुढे त्याच्या चुकीच्या निर्णयांविषयी बोलताना बॉबीने सांगितले, “नंतर मी काही चुकीचे निर्णय घेतले. मला हव्या तशा गोष्टी घडत नव्हत्या. तसं पाहायला गेलं, तर माझे वडील हे इंडस्ट्रीतले लेजंड होते, मग मला तर सतत काम मिळालं असतं. पण जर मुलगा अपयशी ठरत असेल तर वडीलसुद्धा काही मदत करू शकत नाही.”
-
नैराश्येविषयी बोलताना बॉबी म्हणाला, “३ वर्ष मी नैराश्येत होतो. यातून बाहेर पडायला मला एका व्यक्तीने मदत केली आणि ती व्यक्ती दुसरी कोणी नाही तर मी स्वत: आहे. तुमचे कुटुंब तुम्हाला आयुष्यभर साथ देऊ शकते, पण ते तुम्हाला जबरदस्तीने कामावर पाठवू शकत नाही.”
-
“पुढे मी स्वतःवर विश्वास ठेवला. कारण अशा अवस्थेत मला पाहून माझं कुटुंब दुःखी होत आहे, हे पाहून मला खूप वाईट वाटलं.”
-
त्यानंतर बॉबीने ठरवलं की “मला काही तरी करायचं आहे. कारण माझे चाहते अजूनही माझ्या चित्रपटांची प्रतिक्षा करत आहेत. त्यानंतर मी सकारात्म राहण्याचा प्रयत्न केला.”
-
“हे सगळं करणं मला कठीण जातं होत आणि अजूनही अवघड आहे. पण लोक आता माझ्या कामाचं कौतुक करत आहेत”, असं बॉबीने सांगितलं.
-
बॉबी पुढे म्हणाला, “माझ्या या संपूर्ण प्रवासाने मला एक चांगली व्यक्ती आणि चांगला अभिनेता बनवलं. मी माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. १०- १५ वर्षांपूर्वीच्या बॉबीशी तुलना केली तर मी आज स्वत: ला या सगळ्या गोष्टींमध्ये चांगला समजतो. त्यामुळे माझ्या संपूर्ण प्रवासातून मला खूप काही शिकायला मिळाले.”
-
बॉबी लवकरच रणबीर कपूर, परिणीति चोप्रा आणि अनिल कपूर यांच्या सोबत ‘अॅनिमल’ चित्रपटात दिसणार आहे. या व्यतिरिक्त ‘अपने २’ आणि नेटफ्लिक्सवरील Penthouse मध्येही बॉबी दिसणार आहे. (All Photo Credit : Bobby Deol Instagram)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख