-
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘झुंड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सध्या सर्वत्र या चित्रपटाची चर्चा सुरु आहे.
-
‘झुंड’ चित्रपटातील संपूर्ण टीमने नुकतंच ‘झी मराठी’वरील मस्त मजेदार किचन कल्लाकार या कार्यक्रमात हजेरी लावली. (फोटो – झी मराठी/ इन्स्टाग्राम)
-
यावेळी या चित्रपटात बाबू नावाचे पात्र साकारलेल्या प्रियांशू क्षत्रिय याने त्याला हे काम कसे मिळाले, याबद्दलचा किस्सा सांगितला. (फोटो – झी मराठी/ इन्स्टाग्राम)
-
“नागपुरात रेल्वेच्या ट्रॅकजवळच आमची वस्ती आहे. आमचं लहानपण तिथेच गेलं आहे. त्यावेळी मी ट्रेनमधून कोळसा पाडायचो आणि बाकीचे लोकं म्हणजेच माझी टीम ते जमवून विकायचे. त्याचवेळी नागराज मंजुळे यांची एंट्री झाली”, असे तो म्हणाला. (फोटो – झी मराठी/ इन्स्टाग्राम)
-
त्यापुढे प्रियांशू म्हणाला, “मी त्यांना पाहिलं आणि मला वाटलं पोलीस आलेत म्हणून मी सर्वांना पळा असे म्हटलं. पण थोड्यावेळाने त्यांच्या हातात कॅमेरा बघितला, तेव्हा आम्हाला वाटलं की अरे हे न्यूज चॅनलवाले आहेत. पोलीस नाही.” (फोटो – झी मराठी/ इन्स्टाग्राम)
-
lत्यापुढे तो म्हणाला, “ते शूट वैगरे करत होते. त्यावेळी हळूच त्यांनी कॅमेरा आमच्याजवळ वळवला. मी त्यांना विचारले, हे सर्व काय आहे. तर ते म्हणाले, आमचा प्रोजेक्ट चालू आहे.” (फोटो – झी मराठी/ इन्स्टाग्राम)
-
“त्यावर मी पटकन म्हटलं, ते तुमचं प्रोजेक्ट वैगरे असू दे, पण यात वस्तीचे नाव टाकायचे नाही. यामुळे वस्तीचे नाव खराब होते. वस्ती माझी आहे. असे म्हटल्यानतंर ते हसू लागले आणि यानंतरच त्यांनी चित्रपटासाठी विचारणा केली”, असा किस्सा त्याने सांगितला. (फोटो – झी मराठी/ इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, ‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे.
-
अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (फोटो – झी मराठी/ इन्स्टाग्राम)
-
या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘पारू’ मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीची होणार Exit! स्वत: फोटो शेअर करत म्हणाली, “शेवटचा…”