-
बॉलिवूडमध्ये तसं पाहायला गेलं तर लग्न आणि घटस्फोट या गोष्टी फारश्या नवख्या नाहीत.
-
एकमेकांसोबत बरीच वर्षं संसार केल्यानंतरही अनेक सेलिब्रेटी एकमेकांपासून वेगळे झाले आहेत.
-
पण त्यातही बॉलिवूडमधील काही लोकप्रिय जोड्यांचे घटस्फोट मात्र बरेच महागडे ठरले आहेत.
-
अभिनेता फरहान अख्तर अलिकडेच शिबानी दांडेकरसोबत दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकला.
-
पण २०१६मध्ये त्यानं पहिली पत्नी अधुनापासून घटस्फोट घेतला होता. त्यावेळी तिला त्यानं एक घर दिलं आहे.
-
याशिवाय फरहान अख्तरला पत्नी अधुना हिला पोटगी म्हणून प्रतिमहिना मोठी रक्कम द्यावी लागते.
-
अभिनेता संजय दत्तनं काही वर्षांपूर्वी पत्नी रिया पिल्लईपासून घटस्फोट घेतला.
-
मात्र घटस्फोटानंतर त्यानं रियाला पोटगी म्हणून तब्बल ४ कोटी रुपये दिले होते.
-
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा घटस्फोट बॉलिवूडच्या सर्वाधिक चर्चित घटस्फोटांपैकी एक आहे.
-
बिझनेसमन असलेला संजय कपूर करिश्माला प्रतिमहिना १० लाख रुपये पोटगी आणि मुलांचा खर्च म्हणून देतो.
-
अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी घटस्फोट घेतला.
-
घटस्फोटानंतर हृतिक रोशननं पत्नी सुझानला ३८० कोटी रुपये पोटगी म्हणून दिली होती.
-
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी लग्नाच्या ११ वर्षांनंतर घटस्फोट घेतला.
-
त्यांचा हा घटस्फोट बॉलिवूडच्या सर्वात चर्चेत राहिलेल्या घटस्फोटांपैकी एक ठरला होता.
-
घटस्फोटानंतर मलायकानं अरबाजकडे पोटगी म्हणून १५ कोटी रुपयांची मागणी केली होती.
-
अभिनेता सैफ अली खाननं स्वतःपेक्षा वयानं मोठ्या असलेला अमृता सिंगशी लग्न केलं होतं.
-
पण काही वर्षांतच त्यांचा या दोघांचा घटस्फोट झाला. ज्याची बरीच चर्चा झाली होती.
-
सैफनं अमृताला पोटगी म्हणून २.५ कोटी रुपये दिले होते. याशिवाय प्रतिमहिना तो तिला १ लाख रुपये देतो.
-
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचे आतापर्यंत २ घटस्फोट झाले आहेत.
-
मात्र पहिली पत्नी रिना दत्तासोबत झालेला त्याचा घटस्फोट बराच चर्चेत राहिला होता.
-
या घटस्फोटानंतर आमिरनं ५० कोटी रुपये पोटगीच्या स्वरुपात रिनाला दिले होते. (फोटो- सोशल मीडिया)

IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?