-
Rudra Actress Rashi Khanna: अजय देवगण स्टारर अॅक्शन वेब सिरीज रुद्रा OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर रिलीज झाली आहे. या सिरीजमधून अभिनेत्री राशी खन्नाने ओटीटी डेब्यू केला आहे. जाणून घ्या कोण आहे राशी खन्ना…
-
राशी मूळची दिल्लीची आहे. तिने दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमधून बीए ऑनर्स केले आणि नंतर मुंबईला गेली.
-
राशी खन्नाचे वडील राज कुमार खन्ना हे दिल्ली मेट्रोमध्ये काम करतात आणि तिची आई सरिता खन्ना गृहिणी आहे.
-
राशी खन्नाने ‘मद्रास कॅफे’ चित्रपटातून जॉन अब्राहमसोबत तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
-
मद्रास कॅफेनंतर तिला बॉलिवूडमध्ये फारसे काम मिळाले नाही, त्यामुळे ती साऊथ फिल्म इंडस्ट्रीत सेटल झाली.
-
राशी खन्नाने अनेक तमिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आणि प्रसिद्धी मिळवली.
-
उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक चांगला गायिका देखील आहे. पंजाबी कुटुंबातील असलेली राशी तेलगू गाणी देखील गाते.
-
रुद्रामध्ये राशी खन्ना डॉ. आलिया चोक्सीची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.
-
सर्व फोटो: राशी खन्ना फेसबुक

DC vs MI: रोहित शर्माचा एक निर्णय अन् नवा चेंडू ठरला सामन्याचा टर्निंग पॉईंट, डगआऊटमधून हिटमॅन कसा ठरला गेमचेंजर?