-
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बॉलिवूडमधील पहिलावहिला ‘झुंड’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
-
झोपडपट्टीतील मुलांसाठी ‘स्लम सॉकर’ ही संस्था उभारून त्याद्वारे त्यांना फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण देऊन त्यांचं भवितव्य घडवण्याचं काम प्रशिक्षक विजय बरसे गेली कित्येक वर्ष करत आहेत.
-
‘झुंड’ या चित्रपटातून विजय बरसे यांचा जीवनप्रवास दाखविण्यात आला आहे.
-
या चित्रपटात बिग बींनी विजय बरसे पडद्यावर साकारले आहेत.
-
अमिताभ बच्चन यांनी उत्कृष्टरित्या साकारलेल्या ‘झुंड’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
-
याआधीही चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूड कलाकार पडद्यावर प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसले आहेत.
-
अभिनेता आर माधवनचा ‘साला खडूस’ हा चित्रपट बॉक्सिंग या खेळावर आधारित आहे.
-
यात त्याने खडूस बॉक्सिंग प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे.
-
बॉलिवूड किंग शाहरुख खानचा २००७ साली प्रदर्शित झालेला ‘चक दे इंडिया’ हा चित्रपट खूप गाजला.
-
या चित्रपटात शाहरुख हॉकी प्रशिक्षक ‘कबीर खान’च्या भूमिकेत दिसला होता.
-
शाहरुख खानचा ‘सत्तर सिर्फ सत्तर मिनिट है तुम्हारे पास…’ हा चित्रपटातील डायलॉग खूप गाजला होता.
-
भारतीय महिला कुस्तीपट्टू गीता आणि बबिता फोगट यांच्या संघर्षावर आधारित ‘दंगल’ चित्रपट सुपरहिट ठरला होता.
-
‘दंगल’ चित्रपटात अभिनेता आमिर खानने गीता आणि बबिता यांना कुस्तीचे प्रशिक्षण देणाऱ्या वडिलांची भूमिका साकारली होती.
-
बॅडमिंटनपट्टू साइना नेहवालच्या जीवनावर आधारित ‘साइना’ हा चित्रपट २०२१ साली प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा साइना नेहवाल तर अभिनेता मानव कौल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसले.
-
२००५ साली प्रदर्शित झालेला ‘इकबाल’ हा चित्रपट क्रिकेटवर आधारित आहे.
-
या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत तर नसरुद्दीन शाह त्याच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : आयएमडीबी)

‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral