-
सध्याची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण डेन्मार्कमध्ये जन्मली. त्यामुळे तिच्याकडे डॅनिश नागरिकत्व आहे.
-
अभिनेता अक्षय कुमार जवळदेखील भारतीय नागरिक नाही. त्याचा जन्म अमृतसरमध्ये, पालनपोषण दिल्लीत झाले. पण त्याच्याकडे कॅनेडियन पासपोर्ट आहे. त्याने कॅनेडियन नागरिकत्व स्वीकारल्यानंतर भारतीय नागरिकत्व सोडले.
-
अभिनेत्री हेलन या बर्मी वंशाच्या नागरिक आहेत.
-
आलिया भट्ट ब्रिटिश नागरिक आहे. तिची आई सोनी राजदान मुळच्या ब्रिटनमधील असल्याने आलिया भारताचे नागरिकत्व घेण्यास पात्र नाही.
-
कतरिना कैफकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे.
-
आमिर खानचा पुतण्या इम्रान खान हा अमेरिकन नागरिक आहे. अमेरिकेतील मॅडिसन, विस्कॉन्सिन येथे जन्मलेला इम्रान त्याच्या आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर आईसोबत मुंबईत आला.
-
जॅकलीन फर्नांडीस श्रीलंकन नागरिक आहे. तिच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही.
-
अभिनेता फवाद खान हा पाकिस्तानी नागरिक आहे.
-
कल्की कोचलिनचा जन्म पुद्दुचेरी येथे झाला असला ती तिच्याकडे फ्रेंच पासपोर्ट आहे.
-
अभिनेत्री नर्गिस फाखरीकडे अमेरिकन नागरिकत्व आहे.
-
अभिनेत्री सनी लिओनीकडे कॅनेडियन-अमेरिकन नागरिकत्व आहे.
-
एव्हलिन शर्मा ही एक जर्मन मॉडेल आहे. तिचे वडील पंजाबी असून आई जर्मन आहे.
-
अभिनेता आणि गायक अली जफर पाकिस्तानी आहे.
-
मोनिका डोग्राकडे अमेरिकन नागरिकत्व आहे.
-
खामोशियां फेम अभिनेत्री सपना पब्बी मूळची लंडनची असून तिच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे.
-
काईट्स या चित्रपटातील अभिनेत्री बार्बरा मोरी मेक्सिकन- उरुग्वेयन नागरिक आहे.
-
स्वीडनमधील स्टॉकहोम येथे जन्मलेली स्वीडिश ग्रीक अभिनेत्री एली अवराम ही स्वीडिश नागरिक आहे.
-
अॅमी जॅक्सनकडे ब्रिटीश नागरिकत्व आहे. अक्षय कुमार स्टारर ‘सिंग इज ब्लिंग’मध्ये तिने भूमिका साकारली होती. (सर्व फोटो – इंडियन एक्सप्रेस)
Maharashtra Budget 2025 LIVE Updates: ‘लाडकी बहीण योजने’चे पैसे १५०० वरून वाढणार कधी? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…