-
८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर महिला दिन म्हणून साजरा केला जातो. स्त्रीत्वाचा उत्सव म्हणून हा ओळखला जातो. (Photo : Pixabay)
-
या विशेष दिवशी महिलांना त्यांच्या कर्तृत्व आणि समाजातील योगदानासाठी ओळखले जाते. या खास प्रसंगी महिला सक्षमीकरणाचे समर्थन करणारे चित्रपट पाहुयात. (Photo : Pixabay)
-
पिंक (Pink) : रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणारी, रॉक कॉन्सर्टला मुलांबरोबर जाणारी, पार्टी करणारी, अंगावर टॅटू काढलेली, जीन्स-शॉर्ट्स वापरणारी, एकटी राहणारी, सिगरेट ओढणारी, कधी कधी दारूही पिणारी मुलगी म्हणजे कायम ‘अॅव्हेलेबल’ असलेली मुलगी, असा सोयीस्कर अर्थ घेणारी अनेक ‘चांगल्या घरातली’ मुलं असतात.
-
समाज म्हणून आपण नीतिमत्तेच्या अशा किती भंपक कल्पना कुरवाळत असतो आणि त्यानुसार समोरच्या व्यक्तीला जोखत असतो याचा अनुभव ‘पिंक’ चित्रपट बघताना सारखा येतो.
-
प्रत्येक स्त्रीला ‘नाही’ म्हणायचा अधिकार आहे. अगदी शरीरविक्री करणाऱ्या स्त्रीचादेखील हा अधिकार कुणी नाकारू शकत नाही, हा संदेश चित्रपटातून खूप परिणामकारकरित्या देण्यात आलाय.
-
गुंजन सक्सेना (Gunjan Saxena) : अभिनेत्री जान्हवी कपूरने मुख्य भूमिका साकारलेला ‘गुंजन सक्सेना’ हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट अशा एका मुलीच्या कथेवर आधारित आहे जी पायलट बनण्याचे स्वप्न पाहते.
-
गुंजन सक्सेना यांनी दाखवलेलं शौर्य आणि त्यांच्यामुळे एअरफोर्समध्ये मुलींना मिळालेली संधी ही बाब निश्चितच संपूर्ण देशासाठी अभिमानस्पद आहे.
-
क्वीन (Queen) : ‘टिपिकल’ पंजाबी पुराणमतवादी मध्यमवर्गीय कुटूंबातली रानी, आपल्या प्रियकराने आयत्यावेळी लग्नाला नकार दिल्याने हादरते. परंतु नंतर ती एकटीच हनिमून ट्रीपला जाण्याचा निश्चय करते. मनाने पूर्ण भारतीय असली तरी रानीला जगण्याची उमेद देणारा हा परदेश प्रवास प्रेक्षकांनाही बरेच काही सांगून जातो.
-
लाजरीबुजरी, अतिशय सरळ मनाची मध्यमवर्गीय विचार करणारी, परंपरेत अडकलेली, आज्ञाधारक रानी ते स्वच्छंदी पण निश्चयी, अदबशीर पण काहीशी बंडखोर बनते.
-
थप्पड (Thappad) : २०२० साली प्रदर्शित झालेल्या थप्पड या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नूने मुख्य भूमिका साकारली आहे. पतीसोबत आनंदी जीवन जगणाऱ्या अमृताच्या आयुष्यात एक धक्कादायक घटना घडते ज्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्य बदलते.
-
तिचा नवरा त्याच्या ऑफिस पार्टीमध्ये तिला कानाखाली मारतो. या घटनेमुळे धक्का बसल्याने स्वाभिमानी अमृता घटस्फोटासाठी अर्ज करते.
-
राझी (Raazi) : शेजारी राष्ट्रातील एका प्रतिष्ठीत कुटुंबाची सून म्हणून जाणं आणि त्यातही सैन्यदलाशी संलग्न कुटुंबातूनच हेरगिरीची कामं करण्याचा संभाव्य धोका पत्करत सहमत तिचं काम सुरु ठेवते.
-
या साऱ्यामध्ये तिला नेमक्या कोणत्या अडचणी येतात आणि त्या अडचणींमध्येही काही धाडसी निर्णय सहमत नेमकी कशी घेते याचं सुरेख चित्रण ‘राजी’मध्ये करण्यात आलं आहे.
-
एका सत्यघटनेला चित्रपटरुपात प्रेक्षकांसमोर मांडताना थरारक कथानकासोबतच एक प्रेमकहाणीही हळुवरपणे उमलताना दिसते. अर्थात यात कुठेही अतिरंजकता नाही ही बाबही तितकीच खरी.
-
नीरजा (Neerja) : नीरजा भानोत ही एका सर्वसाधारण घरातील मुलगी होती. तिचे कुटुंबही सामान्यच होते. तरीही त्यांच्याकडून जे असामान्य कर्तृत्व घडलं कौतुकास पात्र आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला नीरजा हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे.
-
कर्तव्यपूर्तीसाठी प्रसंगी जिवाचं बलिदान देण्याची तयारी असलेली नीरजासारखी व्यक्तिमत्त्वं आपल्याला आदर्शवत ठरतात.
-
शकुंतला देवी (Shakuntala Devi) : मोडकं तोडकं इंग्रजी, रीतसर शिक्षण नाही; पण उपजत हुशारी, गणिती कौशल्य आणि प्रचंड आत्मविश्वास यांच्या जोरावर दोन वेण्या आणि साडीत दूरदेशात गणिताचा खेळ रंगवणारी शकुंतला ते मानवी संगणक म्हणून लौकिक मिळवलेल्या शकुंतला देवी हा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
-
अभिनेत्री विद्या बालन यांनी ताकदीनिशी वेगवेगळ्या कंगोऱ्यांसह शकुंतला देवी उभी केली आहे.
-
मर्दानी २ (Mardaani 2) : भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती म्हणून ओळखली जाते. या पुरुष प्रधान संस्कृतीचा देशातील चित्रपट क्षेत्रावरही खोलवर परिणाम झाल्याचे दिसते. परंतु अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा मर्दानी २ हा चित्रपट या ठोकळेबाज परंपरेला छेद देणारा आहे.
-
मर्दानी २ मध्ये राणी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवणाऱ्या एका माहिला पोलिस अधिकाऱ्याच्या रुपात दिसली.
-
मुलींना, महिलांना पद्धतशीरपणे लक्ष्य बनवणाऱ्या सीरियल रेपिस्टला पकडण्यासाठी धडपड करणारी शिवानी शिवाजी रॉय अर्थात राणी मुखर्जी आपल्याला या सिनेमामध्ये पाहायला मिळते
-
इंग्लिश विंग्लिश (English Vinglish) : शशी नावाच्या सुखवस्तू गृहिणीची ही कथा. सगळं उत्तम असतं, पण इंग्रजी माध्यमातल्या बुद्धिमान लेकीकडून आणि उच्चशिक्षित पतीकडून तिच्या घरगुती असण्याची आणि इंग्रजी चांगलं न येण्याची सतत चेष्टा होत असते.
-
त्यांना आपली लाज वाटते हे शशीला जाणवत असतं. तिचा आत्मसन्मान दुखावत असतो.
-
हा चित्रपट फक्त भाषेच्या कॉम्प्लेक्सबद्दल बोलत नाही, तर भाषेच्या सामुदायिक कॉम्प्लेक्सचं माध्यम वापरून एकूणच कुठलाही कॉम्प्लेक्स, त्याचं अस्तित्व, त्याला सामोरं जाणं आणि तो संपणं हा प्रवास खूप सुंदर पद्धतीनं, कुठलाही अभिनिवेश न ठेवता उलगडत नेतो.
-
छपाक (Chhapaak) : देशात अनेक महिला अॅसिड हल्ल्याच्या शिकार होतात. मात्र आजही अॅसिडच्या विक्रीवर बंदी नाहीये. ते स्वस्त दरात बाजारात सहज उपलब्ध होतं. परंतु ज्याची काडीमोल किंमत आहे अशा अॅसिडचे परिणाम किती घातक आहेत हे या चित्रपटातून प्रकर्षाने दाखविण्यात आलं आहे.
-
अॅसिड हल्ल्याचा त्या व्यक्तीवर आणि त्याच्या कुटुंबावर होणारा परिणाम ‘छपाक’मधून सादर करण्यात दिग्दर्शिका मेघना गुलजार यांना यश आलं आहे. (सर्व फोटो : इंस्टाग्राम)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ