-
दिग्पाल लांजेकर यांचं दिग्दर्शन असलेला पावनखिंड हा ऐतिहासिक चित्रपट १८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
-
काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे.
-
मराठा योद्ध्यांची शौर्यगाथा असलेल्या ‘पावनखिंड’नं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
-
तेव्हापासून बॉक्स ऑफिसवर याच चित्रपटाचा बोलबाला आहे.
-
मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी पावनखिंडीत दिलेल्या लढ्यावर आधारित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.
-
या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, अंकित मोहन यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे.
-
या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकरनं, तर अजय पुरकर यांच्या अभिनयानं वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत जीव ओतला आहे.
-
अजय पुरकर यांनी मराठी चित्रपट आणि नाटकांसोबत हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलंय.
-
पुरकर यांच्या कोड मंत्र या नाटकाने एकाच वर्षात २४ पुरस्कार मिळवले होते. हे नाटक खूप हिट ठरले होते.
-
अजय पुरकर यांनी बालगंधर्व, प्रेमाची गोष्ट, कदाचित, फेरारी की सवारी, रिस्पेक्ट, फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
-
‘मी एका मुलाखतीत माझ्या ड्रीम रोलबद्दल सांगताना शिवरायांच्या वीर शिलेदारांपैकी असलेले बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका करायला आवडेल, अशी इच्छा व्यक्त केली होती. माझी ही मुलाखत दिग्पाल यांनी पाहिली आणि मला भूमिकेसाठी विचारले.
-
अर्थात, माझे पंचावन्न वय नसल्याने बाजीप्रभूंचे लढाईच्या वेळी जे वय असेल त्या वयानुसार तो राग, ती परिपक्वता आणि शहाणपणा आणण्यासाठी त्यांचा कसून अभ्यास करावा लागला आणि हे सर्व मी त्या व्यक्तिरेखेच्या देहबोलीतून पडद्यावर साकारले आहे.
-
त्यातून विविध छटा या पात्राला असल्याने पती, मार्गदर्शक आणि एक वीर म्हणून ते भाव समोर आणले आहेत. मी त्यांच्यासारखी शरीरयष्टी आणण्यासाठी शंभरच्या वर वजन वाढवले. त्यात स्नायूंचे वजन हवे असल्याने पाव किलो रोज बासुंदी खाण्याची सवय सुरू केली.
-
लढाईच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण करताना मला पहिल्यांदाच जाणवले की आम्ही तिथे एकटे नाही आहोत तर त्या तीनशे वीर शिलेदारांची छाया तिथे आहे आणि या जाणिवेनंतर मात्र मी तीन दिवस फारसा कोणाशी बोललोही नाही, अशी आठवण बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका करणाऱ्या अभिनेते अजय पुरकर यांनी सांगितली.
-
(सर्व फोटो अजय पुरकर यांच्या इन्स्टाग्रामवरून साभार)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO