-
बॉलिवूड अभिनेता फरदीन खान जवळपास १२ वर्षांनी पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. लवकरच तो ‘विस्फोट’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या चित्रपटात फरदीन खानसोबत बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.
-
फरदीन खान हा दिवंगत अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा आहे. नुकतंच एका मुलाखतीत फरदीन खानने त्याच्या वडिलांच्या निधनानंतरच्या संघर्षमय जीवनाबद्दलचा खुलासा केला.
-
तसेच त्याच्या पत्नीला गर्भधारणेच्या सहाव्या महिन्यात जुळी मुले गमावावी लागली. यामुळे दोघांना प्रचंड वेदना झाल्या, याबद्दल सांगितले आहे.
-
“मी २००९ मध्ये माझ्या वडील फिरोज खान यांना गमावले. त्यानंतर मला आणि माझी पत्नी नताशा हिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला”, असे त्याने सांगितले.
-
“त्यावेळी माझ्या पत्नीला गरदोर राहण्यासाठी अडचणी येत होत्या. तिला प्रचंड त्रास होत होता. यामुळे आम्ही IVF चा पर्याय निवडला. पण मुंबईतील डॉक्टरांसोबत आम्हाला खूप वाईट अनुभव आले”, असेही तो म्हणाला.
-
“माझी पत्नी नताशाला खरोखरच खूप त्रास सहन करावा लागला. कारण IVF ही प्रक्रिया दिसायला सोपी असली तरी त्यात गुंतागुंत आहे. यामुळे तुमच्या शरीरावर आणि तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो”, असेही त्याने म्टहले.
-
यापुढे तो म्हणाला, “यानंतर मी २०११ मध्ये नताशाला घेऊन लंडनमध्ये स्थायिक झालो. आम्ही त्या ठिकाणी IVF करण्याचा निर्णय घेतला.”
-
“नताशाला तिच्या सुरुवातीच्या गर्भधारणेदरम्यान जुळी मुले झाली. पण आम्ही त्यांना सहा महिन्यांत गमावले. तो काळ आमच्यासाठी फारक कठीण होता”, असे त्याने सांगितले.
-
अनेक वाईट अनुभवातून गेल्यानंतर मला आणि नताशाला २०१३ मध्ये एक मुलगी झाली. तिने आम्हाला खूप आनंद दिला. “खूप वाईट अनुभवातून गेल्यावर जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला पाहता, तेव्हा तुम्ही ते क्षण अधिक आनंदाने जगता”, असे तो म्हणाला.
-
“ज्यावेळी माझ्या मुलीचा जन्म झाला होता आणि मी तिला पाहिले होते, तेव्हा मला खूप आनंद झाला होता. माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. शेवटी मी बाबा झालो होतो”, असेही त्याने सांगितले.
-
फरदीन खान आणि नताशा डिसेंबर २००५ मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले. त्या दोघांना आता एक मुलगा आणि एक मुलगी आहे. २०१३ मध्ये त्यांच्या एका मुलीचा जन्म झाला आणि मुलीच्या जन्माच्या चार वर्षानंतर २०१७ मध्ये ते एका मुलाचे पालक बनले.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख