-
काही दिवसांपूर्वीच सुरू झालेला अभिनेत्री कंगना रणौतचा ‘लॉक अप’ शो सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. या शोमधील सदस्य लॉकअपमध्ये त्यांच्या आयुष्यातील भूतकाळ तसेच चांगले किंवा वाईट अनुभव एकमेकांसोबत शेअर करताना दिसतायत.
-
सध्या सोशल मीडियावर या शोची चर्चा सुरु आहे. कारण काही दिवसांपूर्वीच पूनम पांडेनं तिच्या आयुष्यातील कठीण काळाचा खुलासा केला होता
-
निशा रावलनंही तिच्या घटस्फोटाबाबत काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या होत्या.
-
या शिवाय जेंडर बदलून ट्रान्सवूमन झालेल्या सायशा शिंदेनेही तिच्या बॉयफ्रेंडबद्दल काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला होता. (Photo Credit : Saisha Shinde Instagram)
-
त्यानंतर आता राजनीती तज्ञ आणि उद्योजक तेहसीन पूनावालाने ही एक धक्कादायक खुलासा केला आहे. (Photo Credit : Tehseen Poonawalla Instagram)
-
.तेहसीनला त्याच्या अॅविक्शन आधी एका स्पर्धकाला सेफ करायचे होते. तर त्याने सायशा शिंदेला सेफ करायचे ठरवले.
-
यावेळी तेहसीनने त्याचं डार्कस्ट सिक्रेट सगळ्यांसमोर सांगितलं. (Photo Credit : Tehseen Poonawalla Instagram)
-
तेहसीन हा धक्कादायक खुलासा करत म्हणाला, “एकदा मला एका मोठ्या उद्योगपती व्यक्तीसोबत कॉन्ट्रॅक्ट साईन करायचा होता. त्यावेळी त्या व्यक्तीने त्याच्याच पत्नीसोबत मला रात्र घालवण्यास सांगितले आणि तरच कॉन्ट्रॅक्ट साईन करणार असे सांगितले.” (Photo Credit : Tehseen Poonawalla Instagram)
-
पुढे तेहसीन म्हणाला, “एक उद्योगपती म्हणून मला काही गोष्टी केवळ समोरच्या व्यक्तीनं सांगितल्या म्हणून कराव्या लागल्या. त्यावेळच्या परिस्थितीमुळे मला वेगळे निर्णयही घ्यावे लागले. त्याला दुसरा काही पर्याय नव्हता.” (Photo Credit : Tehseen Poonawalla Instagram)
-
पुढे म्हणाला, “मला काही करुन सायशाला वाचवायचं होतं, म्हणून मला धक्कादायक खुलासा करावा लागला.” (Photo Credit : Tehseen Poonawalla Instagram)
-
तर शोमधून बाहेर जाण्याआधी फक्त सायशा शिंदेला वाचवण्यासाठी तेहसीनने हा धक्कादायक खुलासा केला होता. (Photo Credit : Saisha Shinde Instagram)
-
लॉक अपमध्ये शोमधून बाहेर जाण्यापासून वाचण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाला त्याचं एक डार्केस्ट सिक्रेट सांगावं लागतं.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा