-
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान आज ५७ वर्षांचा झाला.
-
सुमारे २५ वर्षे बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेला आमिर हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान व लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो.
-
केवळ अभिनयानेच नाही तर हटके स्टाईलने आमिर खानने प्रेक्षकांना भुरळ पाडली.
-
‘दिल चाहता है’ या चित्रपटातील आमिरचा स्पाइकी हेअर आणि व्ही पॅच दाढीमधील लूक तरूणाईच्या पसंतीस पडला होता.
-
२००६ साली प्रदर्शित झालेल्या ‘फना’ या बॉलिवूड चित्रपटातील आमिरच्या लॉंग हेअर लूकची देखील बरीच चर्चा रंगली होती.
-
‘गजनी’ चित्रपटातील आमिरचा लूक गजनी कट नावाने प्रसिद्ध झाला होता. गजनी कटमुळे आमिरने चाहत्यांमध्ये क्रेझ निर्माण केली होती.
-
२००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाला देखील चाहत्यांकडून विशेष प्रेम मिळाले.
-
या चित्रपटातील कूल स्पाइकी हेअर लूकमधील शिक्षक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
-
‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ चित्रपटातील मिशीमधला आमिरचा हटके लूकदेखील चाहत्यांना भावला. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य