-
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच अभिनेता आमिर खान लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आमिर हा सोशल मीडियावर सक्रिय नसला तरी त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो.
-
आमिरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, त्याच्या आणि पहिली पत्नी रीनादत्तासोबतच्या घटस्फोटावर वक्तव्य केलं आहे.
-
रीना आणि आमिर हे आधी शेजारी होते. असं म्हटलं जातं की ते दोघे एकमेकांना गुपचुप बघायचे.
-
आमिरला रीना प्रचंड आवडत होती आणि त्याने त्याच्या भावना सांगायचा बऱ्याचवेळा प्रयत्न केला पण तो अपयशी झाला.
-
आमिरने बरेच प्रयत्न केले आणि रीनाशी त्याचं लग्न झालं. दोघांनी १८ एप्रिल १९८६ साली लग्न केले.
-
लग्नाच्या काही वर्षांनंतर रीनाने मुलगा जुनैद आणि मुलगी आइराला जन्म दिला. त्याच्या काही वर्षांनंतर ते दोघं विभक्त झाले.
-
आमिर आणि रीनाचा २००२ मध्ये घटस्फोट झाला. असं म्हटलं जातं होतं की त्यांच्या घटस्फोटाचं कारण किरण राव होती. तर आमिरने ‘न्यूज १८’ ला दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे.
-
आमिर त्याच्या आणि रीनाच्या घटस्फोटाविषयी म्हणाला, “जेव्हा मी आणि रीना विभक्त झालो. त्यावेळी माझ्या आयुष्यात कोणीच नव्हतं. रीना आणि माझा घटस्फोट होण्यापूर्वीच मी किरण रावला भेटलो असे अनेकांना वाटते पण ते सत्य नाही.”
-
पुढे आमिर म्हणाला, “किरण आणि मी जेव्हा भेटलो तेव्हा आम्ही एकमेकांना जास्त ओळखत नव्हतो. बऱ्याच दिवसानंतर आमची मैत्री झाली. मी खूप भाग्यवान आहे. माझी पहिली पत्नी रीनाजी होती. त्यावेळी आम्ही दोघे खूप लहान होतो. आम्ही एकत्रच मोठे झालो, वेगळे होऊनही आम्ही एकत्र आहोत.”
-
आमिर रीनाची स्तुती करत म्हणाला, “मी आणि रीना आजही सोबत आहोत. कारण ती एक व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे आणि तिलाही वाटते की मी एक चांगला माणूस आहे. मी, किरण जी आणि रीना जी अजूनही एकत्र काम करतो.”
-
पुढे आमिर म्हणाला, “सहसा जेव्हा कोणते ही कपल विभक्त होते. तेव्हा त्यांच्यात खूप भांडणं होतात. पण हे माझ्या आणि रीनाजी किंवा किरणजी सोबत घडलं नाही. माझी धाकटी बहीण फरहत हिचा विवाह रीनाचा धाकटा भाऊ राजीव दत्ता याच्याशी झाला आहे. त्यामुळे आमचे कुटुंब एकमेकांशी जोडलेले आहे.”
-
आमिर आणि रीनाने ‘कयामत से कयामत’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.
-
या चित्रपटात आमिरसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री जूही चावला होती. पण रीनाने या चित्रपटात एक लहान भूमिका साकारली होती.
-
रीनाने आमिरच्या ‘लगान’ चित्रपटाची निर्मिती केली होती. याच चित्रपटामुळे आमिरचं करिअर झालं होतं.
-
तर लगान या चित्रपटाच्या सेटवरच किरण रावने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. ( Photo Credit : Indian Express and File Photo)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”