-
बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला.
-
हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. हा चित्रपट चर्चेत असला तरी यापूर्वी काश्मीरमधील परिस्थितीवर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट बनले आहेत. पाहुयात कोणते आहेत हे चित्रपट…
-
2020 मध्ये आलेला शिकारा हा चित्रपट देखील खोऱ्यातील काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा होते.
-
विशाल भारद्वाज यांनी काश्मीरमधील परिस्थितीवर ‘हैदर’ हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी शाहिद कपूरला अनेक पुरस्कारही मिळाले.
-
2010 मध्ये आलेला ‘हारूद’ हा चित्रपट काश्मीरमधील परिस्थितीचे वर्णन करतो. आमिर बशीर या चित्रपटाचे दिग्दर्शक होते.
-
शूजित सरकारचा ‘यहां’ हा चित्रपट खोऱ्यातील दोन जोडप्यांच्या प्रेमावर आधारीत आहे. यामध्ये काश्मीरमधील परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे.
-
2010 साली आलेल्या ‘इंशाअल्लाह फुटबॉल’ या चित्रपटातही खोऱ्यातील समस्या दाखवण्यात आल्या आहेत. -
2018 मध्ये आलेला ‘हमीद’ हा चित्रपट काश्मीरमधील परिस्थिती दर्शवणारा होता. हा चित्रपट एजाज खानने दिग्दर्शित केला होता.
-
1995 साली आलेला ‘रोजा’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले होते. (फोटो – सोशल मीडिया)

वेश्याव्यवसायातून महिलेची १५ वर्षांनी झाली सुटका, घरी पोहोचताच कुटुंबियांनी…