-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. जीवनात कितीही टेन्शन, ताण असला तरीदेखील सारं काही ठाराविक काळासाठी विसरायला लावणारा कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाने विशेष ओळख निर्माण केली आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून समीर चौगुलेला ओळखले जाते.
-
अभिनेता आणि लेखक समीर चौगुले हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षकासाठी नवीन नाही. अनेक मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून समीर चौगुलेंनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे.
-
आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना हसवणारा हा अभिनेता एक उत्तम लेखकदेखील आहे. तो सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो.
-
नुकतंच समीर चौगुले यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
-
यात ते पत्नी आणि कुटुंबासह दुबईत सुट्ट्या घालवताना दिसत आहे.
-
समीर चौगुले यांनी त्यांच्या दुबईतील सुट्ट्यांचे काही निवडक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
“बहुप्रतिक्षित छोटी सुट्टी दुबईत”, असे त्यांनी या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे.
-
त्यासोबत ते म्हणाले, “आ विस्फारलेल्या डोळ्यांनी बघावं असं शहर आणि “याचे इंडियन रूपीज मध्ये किती होतात!” असा विचार करत करत केलेली खरेदी.. चार दिवस सुखाचे.”
-
दरम्यान त्यांच्या या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट पाहायला मिळत आहे. अनेकांनी त्यावर ‘छान’, ‘मज्जा करा’, अशा कमेंट केल्या आहेत.
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”