-
ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात प्रेक्षकांना उत्कृष्ट चित्रपट आणि वेबसीरिजची मेजवानीच मिळणार आहे. पाहुयात या आठवड्यात कोणकोणते चित्रपट आणि वेबसीरीज रिलीज होणार आहेत.
-
१८ मार्चला झी5वर ६ एपिसोड असलेली ‘ब्लडी ब्रदर्स’ ही वेबसीरीज रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये जयदीप अहलावत, झीशान अयुब आणि मुग्धा गोडसे यांच्या भूमिका आहेत.
-
विद्या बालनचा बहुप्रतिक्षित ‘जलसा’ हा चित्रपट १७ मार्चला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. विद्या बालनशिवाय या चित्रपटात शेफाली शाह आणि मानव कौल यांच्या मुख्य भूमिका आहेत.
-
एकता कपूर आणि जिओ स्टुडिओजच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेली ‘अपहरण 2’ ही वेबसीरिजही होळीच्या मुहूर्तावर रिलीज होत आहे. वूट सिलेक्ट अॅपवर आपल्याला ही सीरिज पाहता येईल.
-
होळीच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवर ‘इटर्नली कन्फ्युज्ड आणि एगर टू लव्ह’ ही सीरिज देखील रिलीज होत आहे.
-
‘मिस्टर अँड मिसेस शमीम’ ही वेब सिरीज झी5 वर १७ मार्च रोजी रिलीज होत आहे.

‘एमपीएससी’ची राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात मोठा निर्णय… एमपीएससीच्या बैठकीत ठरले की….