-
आनंदाचा, उत्साहाचा आणि रंगांचा सण म्हणजे होळी.
-
रंगांची मनसोक्त उधळण करून आपापसातले सारे हेवेदावे विसरायला लावणारा सण म्हणजे होळी.
-
‘मराठी परंपरा, मराठी प्रवाह’ हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये होळी आणि धुळवडीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.
-
‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत अप्पू आणि शशांकची लग्नानंतरची पहिलीच होळी आहे. कानेटकर कुटुंबात या खास दिवसाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
-
पुरणपोळीचा सुग्रास बेत तर आहेच. पण अप्पुच्या इच्छेखातर संपूर्ण कानेटकर कुटुंबाने राधा कृष्णाचं रूप धारण केलंय. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणाऱ्या कानेटकर कुटुंबात होळीच्या सणाला गोकुळ अवतरणार आहे असंच म्हणावं लागेल.
-
‘आई कुठे काय करते’ मालिकेतही दरवर्षी प्रमाणे होळी आणि धुळवड साजरी होणार आहे.
-
यंदाचा होळीचा सण ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील अंजी पश्यासाठी खास ठरणार आहे.
-
रंगांची उधळण करत हे दोघही आपल्या प्रेमाची कबुली देणार आहेत.
-
‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपा आणि कार्तिकच्या आयुष्यातही पुन्हा प्रेमाचे रंग भरले जातील का हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल.
-
‘मुरांबा’ मालिकेतही होळीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.
-
‘मुलगी झाली हो’, ‘स्वाभिमान’ आणि ‘सुख म्हणजे नक्की काय’ असतं मालिकेतही होळीची धामधूम अनुभवायला मिळेल.
-
मालिकेतील होळी विशेष भागाच्या निमित्ताने कलाकारांनी चांगलीच धमाल केली आहे.

India beats Pakistan Video: पाकिस्तानी युवतीचा त्रागा; म्हणाली, “हरलात ते ठीक आहे, पण त्या कोहलीचं शतक…”!