-
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेले दोन कलाकार म्हणजे आर्ची आणि परश्या.
-
‘झुंड’ या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
-
आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू आणि परश्या ही भूमिका साकारणारा आकाश ठोसर हे दोघेही कायमच चर्चेत असतात.
-
गेल्या काही दिवसांपासून रिंकू आणि आकाश हा ‘झुंड’ चित्रपटाच्या प्रमोशनासाठी सतत एकत्र दिसून येतात.
-
नुकतंच रिंकूने त्यांच्या प्रमोशनदरम्यानचे आकाशसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
रिंकू आणि आकाशने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.
-
या फोटोच्या कॅप्शनमुळे अनेकांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले आहे. तिच्या या कॅप्शनची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
-
“प्रत्येक फोटोमध्ये माझे हावभाव वेगळे आहेत आणि या मुलाचे मात्र सारखेच…”, असे रिंकूने आकाशसोबतचे फोटो शेअर करताना म्हटले आहे.
-
तर आकाशने हे फोटो शेअर करताना म्हटले की, “तुमचे हास्य जगासोबत शेअर करा. हे मैत्री आणि शांतीचे प्रतीक आहे.”
-
रिंकू आणि आकाशच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहेत.

Daily Horoscope: हनुमान जयंतीला मारुतीराया कोणाला देणार बळ? राशीनुसार ‘ही’ कामं केल्यास तुमचाही दिवस ठरेल फायद्याचा