-
लोकप्रिय अभिनेत्री अदिती सारंगधर ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेत ‘मालविका’ हे पात्र ती साकारत आहे.
-
अदितीने नुकतंच होळी स्पेशल फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
पांढऱ्या रंगाची नक्षीदार नऊवारी साडी, नथ आणि चंद्रकोर असा खास मराठमोळा पेहराव तिने होळीनिमित्त केलेल्या फोटोशूटसाठी केला आहे.
-
होळीच्या रंगात रंगली अदिती सारंगधर.
-
“रंग हे माझ्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहेत.”, असं कॅप्शन अदितीने या फोटोला दिलं आहे.
-
खेळताना रंग बाई होळीचा…फोटोशूटसाठी खास पोज देताना अदिती. ( सर्व फोटो : अदिती सारंगधर / इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”