-
अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. सलमान खानने आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. यानंतर आता लवकरच सलमान खान दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार चिरंजीवींच्या ‘गॉडफादर’ चित्रपटात सलमान खान दिसणार आहे.
-
बॉलिवूडमधील एका चित्रपटासाठी १०० कोटींपर्यंतचे शुल्क घेणाऱ्या सलमानने गॉडफादर चित्रपटाचे मानधन म्हणून २० कोटी रुपये घेण्यास नकार दिला होता, नुकतंच याबाबतची माहिती समोर आली आहे.
-
मिळालेल्या माहितीनुसार, सुपरस्टार चिरंजीवींच्या ‘गॉडफादर’ चित्रपटातील भूमिकेसाठी सलमान खानला कोट्यावधी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. पण त्याने मैत्रीखातर ही ऑफर नाकारली आहे.
-
‘पिंकविला’ने दिलेल्या एका वृत्तानुसार, ‘गॉडफादर’मधील एका भूमिकेसाठी सलमान खानने एक रुपयाही घेतलेला नाही. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सलमानला कोट्यावधी रुपयांची ऑफर दिली होती. मात्र त्याने यासाठी नकार दिला आहे.
-
‘मी चिरंजीवीचा मित्र आहे. त्यासोबतच मी त्याचा फार आदर करतो. त्यामुळे मी या चित्रपटासाठी कोणतेही शुल्क घेणार नाही’, असे सलमानने सांगितले होते.
-
‘गॉडफादर’ हा चित्रपटात काम करण्यापूर्वीच सलमान खानने निर्मात्यांना एक अटही घातली होती.
-
या अटीनुसार सलमानने सांगितले होते की ‘मी या चित्रपटात नक्की काम करेन. पण त्यासाठी तुम्ही मला कोणतेही शुल्क देणार नाही. तरच मी यासाठी होकार देईन.
-
‘गॉडफादर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहन राजा करणार आहेत. हा चित्रपट मल्याळम सुपरहिट चित्रपट ‘लुसिफर’चा रिमेक असेल.
-
सलमान या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहे.
-
ही भूमिका लूसिफरमधील पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासारखीच असणार आहे. या चित्रपटात पृथ्वीराज यांनी छोटी भूमिका केली होती.
-
‘गॉडफादर’ हा पॉलिटिकल अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. सलमान आणि चिरंजीवीशिवाय नयनतारा, सत्यदेव कंचरण, जय प्रकाश हे कलाकार दिसणार आहेत.
-
या चित्रपटात अनुष्का शेट्टी, राम चरण आणि श्रुती हासन देखील दिसणार आहेत.

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही