-
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे अभिनयासोबतच व्यवसायातही हात आजमावत आहेत. काही जण त्यांच्या व्यवसायात यशस्वी ठरले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री देखील यामध्ये मागे नाही. इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध अभिनेत्री साईड बिझनेस करून पैसा कमवत आहेत. चला जाणून घेऊया या अभिनेत्री आणि त्यांच्या साईड बिझनेसबद्दल.
-
दीपिका पदुकोण ‘ऑल अबाउट यू’ नावाचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड चालवते.
-
शिल्पा शेट्टी रेस्तराँ व्यवसायासोबतच तिचे स्वतःचे YouTube चॅनल चालवते, ज्याद्वारे ती लोकांना निरोगी राहण्यासाठी टिप्स देते.
-
प्रियांका चोप्रा ‘अॅनोमली’ नावाने स्वतःचा हेअर केअर ब्रँड चालवते. यासोबतच ती न्यूयॉर्कमध्ये रेस्तराँही चालवते.
-
सुष्मिता सेनचे स्वतःचे एक रेस्तराँ आहे. यासोबतच ती दुबईमध्ये स्वत:चं ज्वेलरी शोरूमही चालवते.
-
योग स्टुडिओ चालवण्यासोबतच मलायका अरोरा ‘लेबल लाइफ’ नावाचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड देखील चालवते.
-
कतरिना कैफ ‘के ब्युटी’ नावाचा कॉस्मेटीक ब्रँड चालवते.
-
सनी लिओनीचा स्वतःचा कॉस्मेटिक ब्रँडही आहे. यासोबतच ती ‘सनसिटी’ नावाचे प्रोडक्शन हाऊसही चालवते.
-
ट्विंकल खन्ना लेखिका असून ती व्हाईट विंडो नावाचे स्वतःते इंटीरिअर डेकोरेशनचे स्टोअर सांभाळते.
-
आलिया भट्टने २०१३ मध्ये स्टाईल क्रॅकर नावाचा ब्रँड सुरू केला. याशिवाय आलियाने २०२० मध्ये Ad-E-Mamma नावाची कंपनी देखील सुरू केली. या कंपनीअंतर्गत ती ४ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी फॅशन ब्रँड चालवते.
-
सोनम कपूर तिची लहान बहीण रिया कपूरसोबत फॅशन अॅक्सेसरीज ब्रँड ‘RHESON’ चालवते.
-
अनुष्का शर्माचा Nush नावाचा कपड्यांचा ब्रँड आहे. (फोटो – सोशल मीडिया आणि इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

Indian Students In US: अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के भारतीयांचा व्हिसा रद्द, “सरकार दखल घेणार का?” काँग्रेसचा प्रश्न