-
छोट्या पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे.
-
अल्पावधीतच या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत अनेक उत्कंठावर्धक वळण येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
या मालिकेत दीपा आणि कार्तिक या जोडीला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे.
-
नुकतंच या मालिकेत कार्तिक हा कधीही बाबा होऊ शकत नाही हे सत्य दिपाला समजल्याचे पाहायाला मिळत आहे.
-
तर दुसरीकडे दीपिकाला ती अनाथ असल्याचे समजले आहे. त्यामुळे ती घर सोडून दीपाकडे जाताना दिसत आहे.
-
तसेच तिकडे आएशा ही विविध कट कारस्थान रचत दीपा आणि कार्तिकला वेगळ करण्याचे प्लॅन करताना पाहायला मिळत आहे.
-
‘रंग माझा वेगळा’ लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत आहे. तर कार्तिकची भूमिका अभिनेता आशुतोष गोखले साकारत आहे.
-
या मालिकेत दिपा आणि कार्तिकच्या दोन्ही मुली दीपिका आणि कार्तिकी या चांगल्याच प्रसिद्धीझोतात आल्या आहेत.
-
दीपिका आणि कार्तिकी या दोघींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या मालिकेतील दीपिका नक्की कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
-
या मालिकेत दीपिकाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. तिचा निरागस चेहरा, बोलणं या सर्वच गोष्टी प्रेक्षकांना भावताना दिसत आहे.
-
दीपिकाचे खरे नाव स्पृहा दळी असे आहे. स्पृहा ही अवघ्या ७ वर्षाची असून ती सध्या दुसरीत शिकत आहे.
-
दीपिका या मालिकेच्या एका भागासाठी तब्बल १० ते १२ हजार रुपये मानधन घेत असल्याचे बोललं जात आहे.
-
त्यासोबत या मालिकेत कार्तिकीची भूमिका साकारणारी साईशा भोईर हिलाही तितकेच मानधन मिळत असल्याची माहिती समोर येत आहे.
-
या दोघीही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. त्यांचा चाहतावर्गही फार मोठा आहे.
प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न