-
दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या या वर्षाच्या सुरुवातीला विभक्त झाले.
-
दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोटाची माहिती दिली होती.
-
ऐश्वर्या ही प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांची मुलगी आहे.
-
साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आणि अभिनेता धनुषची माजी पत्नी ऐश्वर्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
ऐश्वर्या ‘ओ साथी चल’ या बॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.
-
सत्य घटनांवर आधारित या चित्रपटाची निर्मिती मीनू अरोरा यांनी केली आहे.
-
मीनू अरोराने एका मीडिया मुलाखतीत ऐश्वर्याच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल सांगितले आहे. मात्र, त्यांनी या चित्रपटाबाबत अधिक खुलासा करण्यास नकार दिला.
-
ऐश्वर्यापूर्वी तिचे वडील रजनीकांत आणि माजी पती धनुष यांनीही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
या दोघांनाही हिंदी प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती.
-
दरम्यान आता ऐश्वर्याही बॉलिवूडकडे वळली आहे. रजनीकांत आणि धनुषप्रमाणे लोक ऐश्वर्याला प्रेम देतात की नाही हे येत्या काळात कळेल.
-
लग्नाच्या तब्बल १८ वर्षांनी धनुष आणि ऐश्वर्या यांनी घटस्फोटाची घोषणा केली होती.
-
सर्व फोटो – सोशल मीडियावरून साभार)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित