-
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अंकिताने २०२१ मध्ये बॉयफ्रेंड विकी जेनसोबत लग्न केलं.
-
या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. अंकिता आणि विकी जैन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.
-
बऱ्याचवेळा हे दोघं त्यांच्या खासगी आयुष्यावर बोलताना दिसतात आणि पुन्हा एकदा यामुळे ते चर्चेत आले आहेत.
-
अंकिता आणि विकी अजून त्यांच्या घरी गेले नाहीत. विकी गेल्या दोन वर्षांपासून अंकिताच्या घरी घर जावई म्हणून राहत आहे.
-
‘ईटाम्स’ला दिलेल्या मुलाखतीत विकीला प्रश्न विचारला की “आपल्या घरातली स्पेस ही पत्नीसोबत शेअर करताना कसं वाटतं?” तर यावर विकी म्हणाला की याचं उत्तर “अंकिताने द्यायला हवं.”
-
पुढे हसत हसत विकी म्हणाला, “आम्ही घेतलेल्या घरात अजूनही रेनोवेशनचं काम सुरू आहे. त्यामुळे आम्ही आमच्या नवीन घरात शिफ्ट होऊ शकलो नाही.”
-
पुढे विकी म्हणाला, “मी अजूनही अंकिताच्या घरी ‘घर जावई’ म्हणून राहत आहे. मी जेव्हाही मुंबईत येतो. तेव्हा अंकिताच्या घरी राहतो.”
-
“त्यामुळे हा प्रश्न अंकिताला विचारायला हवा, कारण तिचं घर, तिचं कपाट माझ्यासोबत शेअर करून तिला कसं वाटतंय.”
-
यावर अंकिता म्हणाली, “मला वाटतं की एक कपल म्हणून आमचं खरं आयुष्य एकत्र तेव्हा सुरू होईल जेव्हा आम्ही दोघे पती-पत्नी म्हणून आमच्या घरात एकाच छताखाली राहू.”
-
पुढे अंकिता म्हणाली, “जेव्हा आपण आपलं घर बांधायला सुरुवात करतो, तेव्हा ती त्या कपलच्या प्रवासाची सुरुवात असते. मला माहीत आहे की मी खूप चांगली गृहिणी होणार. विकीसोबत माझे आयुष्य आणि इतर काहीही शेअर करण्यात मला कोणतीही अडचण नाही.”
-
अंकिता आणि विकी यांनी १४ डिसेंबर २०२१ रोजी लग्न केले.
-
नुकतीच ही जोडी आपल्याला ‘स्मार्ट जोडी’ या शोमध्ये दिसली. (All Photo Credit : Ankita Lokhande Instagram)
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…