-
टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री असलेली सना खान भलेही ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दुरावली असेल पण ती नेहमीच चर्चेत असते.
-
काही वर्षांपूर्वीच सना गुजरातचे उद्योगपती मुफ्ती अनस सय्यद यांच्यासोबत लग्न करून बॉलिवूडपासून दूर झाली.
-
मात्र सना पूर्वीप्रमाणेच आताही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे.
-
आता सनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती जगातील सर्वात उंच रेस्टॉरंटमध्ये गोल्ड टी पिताना दिसत आहे.
-
दुबईतील बुर्ज खलिफा येथील जगातील सर्वात उंच रेस्तराँ अॅटमॉस्फियर दुबई येथे सना खान सोन्याचा मुलामा असलेला चहा पिताना दिसली.
-
अॅटमॉस्फियर दुबईच्या लॉंजमध्ये बसून सना ही सोन्याचा मुलामा दिलेली चहा पित होती.
-
हे रेस्तराँ, जगातील सर्वाधिक उंचीवर असलेले रेस्तराँ असल्याचा दावा करते.
-
इथला चहा आणि जेवण खूप महाग आहे.
-
सनाने प्यायलेल्या गोल्ड प्लेटेड चहाची किंमत १६० दिरहम म्हणजेच सुमारे ३३०० रुपये आहे.
-
सनाचे पती मुफ्ती अनस सय्यद हे गुजरातमधील सुरत येथील एक मोठे व्यापारी आणि इस्लामिक विद्वान आहेत. त्यांच्या कुटुंबाचा हिऱ्यांचा व्यवसाय आहे.
-
२१ नोव्हेंबर २०२० ला सनासोबत लग्न केल्यानंतर ते चर्चेत आले होते. सना आपल्या पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
सर्व फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख