-
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या देशभरामध्ये जोरदार चर्चा आहे.
-
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका आठवड्यात त्याने १०० कोटींच्या कमाईचा टप्पा ओलांडला असून लवकरच दोन २०० कोटींच्या क्लबमध्ये जाणार आहे.
-
देशभरामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’वरुन राजकारण चांगलेच तापलेलं असताना दुसरीकडे तिकीटबारीवर विवेक अग्नहोत्रींच्या या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळत आहे.
-
विवेक अग्निहोत्री यांची पत्नी पल्लवी जोशीनेही या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे.
-
पल्लवीने ‘द कश्मीर फाइल्स’मध्ये साकारलेल्या राधिका मेनन या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अनेकांनी पल्लवीच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.
-
पल्लवी ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या निर्मात्या देखील आहेत.
-
मराठीमधील सारेगमप सारख्या कार्यक्रमांमधून सुत्रसंचालिका म्हणून घराघरात पोहचलेला पल्लवीचा चेहरा सध्या जगभरामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’च्या माध्यमातून गाजतोय.
-
मात्र तुम्हाला पल्लवीचं मराठीमधील प्रसिद्ध गायक स्वप्नील बांडोकरशी असलेलं खास नातं माहितीय का? असं विचारल्यास तुमचं उत्तर नक्कीच नाही असं असणार.
-
पण ‘द कश्मीर फाइल्स’मुळे चर्चेत असलेली आणि सध्या या चित्रपटाच्या निमित्ताने पती विवेक अग्निहोत्रीसोबत वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरत असणाऱ्या पल्लवी आणि स्वप्नीलचं एक खास नातं आहे.
-
सध्या पल्लवी ही अनेक मान्यवरांना ‘द कश्मीर फाइल्स’च्या निमित्ताने भेटत आहे. नुकतीच पल्लवी आणि चित्रपटाच्या टीमनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पंतप्रधानांनाही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
-
त्याचबरोबरच विवेक अग्निहोत्रींसोबत ‘द कश्मीर फाइल्स’च्या संपूर्ण टीमने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही काही दिवसांपूर्वी भेट घेतली.
या भेटीच्या वेळी विवेक यांच्यासोबत त्यांची पत्नी पल्लवी जोशी, अभिनेते अनुपम खेरही उपस्थित होते. -
अमित शाह यांनी या टीमसोबत मनमोकळेपणे गप्पा मारल्याचे काही फोटो अतुल अग्निहोत्रींनी शेअर केलेत.
पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री हे दोघे एकमेकांना १९९० साली एका रॉक कॉन्सर्टमध्ये भेटले. तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २८ जून १९९७ ला दोघे विवाहबंधनात अडकले. -
या दोघांनी अनेकदा मुलाखतींमध्ये आपल्या लव्हस्टोरीबद्दल मनमोकळेपणे भाष्य केलंय.
-
या दोघांची पहिली भेट म्हणावी तितकी रोमॅन्टीक नव्हती. मात्र नंतर त्यांच्या भेटीमधून मैत्री झाली आणि नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
-
विवेक आणि पल्लवी यांनी अनेक प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केलं आहे. विवेक यांचं म्हणणं आहे की, पल्लवीसोबत काम केल्याने आपल्यातील नातं अधिक दृढ झालं.
-
लग्नाचा आमच्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. आम्ही दोघेही एकमेकांच्या कामाचा आदर करतो, असं विवेक त्यांच्या नात्याबद्दल बोलताना सांगतात.
-
काही दिवसांपूर्वीच पल्लवी जोशी या चित्रपटाच्यानिमित्ताने झी मराठीवरील चला हवा येऊ द्याच्या मंचावर आली होती.
-
पल्लवी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती त्यावेळेस शोमध्ये चिन्मय मांडलेकर आणि स्वप्नील बांडोकर यांनीही हजेरी लावली होती.
-
स्वप्नीलने या चित्रपटामधील गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. तर चिन्मयने या चित्रपटामध्ये फारुख मलिक बिट्टा या दहशतवाद्याची भूमिका साकारलीय.
-
तसं स्वप्नील आणि पल्लवीचं खास नातं सांगायचं झालं तर स्वप्नील आणि पल्लवी हे दूरचे नातेवाईक आहेत.
-
स्वप्नीलची पत्नी संपदा बांडोकर ही पल्लवीची मावस बहीण आहे.
-
संपदा देखील पार्श्वगायिका असून ती मुलांना संगीत शिकवते. संपदाने भारतीय संगीताचं शिक्षण घेतलं आहे. नवख्या कलाकारांना संपदा संगीताचं प्रशिक्षण देते.
-
पल्लवीचं संपूर्ण कुटुंबच चित्रपट आणि मनोरंजन सृष्टीशी संबंधित आहे.
-
पल्लवी आणि संपदाच्या नात्याच्या निमित्ताने मनोकरंजन सृष्टीत काम करणाऱ्या तिच्या कुटुंबियांमध्ये स्वप्नील आणि संपदाचाही समावेश होतो असेच म्हणता येईल. (सर्व फोटो सोशल मीडियावरुन साभार)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…