-
बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक अभिनेत्रींनी आकर्षक दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करवून घेतली. मात्र, यापैकी काही अभिनेत्रींसाठी प्लास्टिक सर्जरी लकी ठरली, तर काहींचे करिअर उद्ध्वस्त झालेत…
-
पीके चित्रपटादरम्यान अनुष्का शर्माने तिच्या ओठांची शस्त्रक्रिया केली होती. मात्र त्याचा तिच्या करिअरवर कोणताही परिणाम झाला नाही.
-
प्रियांका चोप्राने नाकाची प्लास्टिक सर्जरी करवून घेतली. इंटरनॅशनल स्टार झालेल्या प्रियांकासाठी ही सर्जरी लकी ठरली, असं म्हणायला हरकत नाही.
-
शिल्पा शेट्टीनेही आकर्षक दिसण्यासाठी अनेक प्रकारच्या प्लास्टिक सर्जरी करवून घेतल्या.
-
वाणी कपूरनेही चेहऱ्यावर सर्जरी करवून घेतली आहे.
-
कोएना मित्राने तिच्या नाक आणि ओठांवर प्लास्टिक सर्जरी केली होती. शस्त्रक्रियेमुळे तिचा चेहरा इतका खराब झाला की तिचे करिअर उद्ध्वस्त झाले.
-
श्रृती हासनने नाकाची प्लास्टिक सर्जरी करवून घेतली.
-
आयशा टाकियानेही अनेक प्रकारच्या प्लास्टिक सर्जरी केल्या. परंतु अभिनयाला अलविदा केल्यानंतर तिने प्लास्टिक सर्जरी केली. सर्जरीनंतर तिचा चेहरा बराच बदलला आहे.
-
अभिनेत्री राखी सावंतनेही अनेक प्रकारच्या प्लास्टिक सर्जरी केल्या आहेत. मात्र, या शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या कारकिर्दीला ना फायदा झाला ना नुकसान. (फोटो – सोशल मीडिया)

Waqf Amendment Bill: वक्फ दुरूस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूर, पंतप्रधानांची मतदानाला दांडी