-
झी मराठी वाहिनीवरील ‘मन झालं बाजिंद’ ही लोकप्रिय मालिका आहे. मालिकेतील राया-कृष्णा या पात्रांनी अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.
-
मालिकेत आता एक अनपेक्षित वळण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
-
कृष्णाचा जीव वाचवण्यासाठी तिला घटस्फोट द्यायचा निर्णय रायाने घेतला आहे.
-
त्याच दरम्यान गावाची बगाड यात्रा जवळ आली आहे. याच निमित्ताने मालिकेत सातारा भागातील प्रसिद्ध बगाड यात्रा दाखवण्यात येणार आहे.
-
अनेक वर्षांची परंपरा असलेले बगाड प्रेक्षकांना ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेच्या निमित्ताने टीव्हीवर पाहायाला मिळणार आहे.
-
वाईमधील फुलेनगर-शहाबाग येथे मालिकेतील या भागांचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
-
मालिकेतील या भागांचे प्रक्षेपण २५ ते २९ मार्च दरम्यान करण्यात येणार आहे.
-
‘मन झालं बाजिंद’ मालिकेतील रायाची भूमिका अभिनेता वैभव चव्हाण याने साकारली आहे.
-
या विशेष भागांचे चित्रीकरण करतानाचे अनुभव सांगताना वैभव म्हणाला, “हा प्रसंग चित्रित करणं सोपं नव्हतं. पण या गावातील रहिवासींनी आम्हाला खूप सहकार्य केलं. ‘बगाड’ म्हणजे काय आणि त्यासाठी लागणारी मेहनत याबद्दल इथल्या स्थानिकांनी माहिती दिली. त्यामुळे आम्हालाही या परंपरेची ओळख झाली आणि आता प्रेक्षकांना सुद्धा बगाड यात्रा पाहायला मिळेल.”
‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…