-
दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘आरआरआर’ हा चित्रपट २५ मार्चला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटाद्वारे राजमौली पुन्हा एकदा ब्लॉक्सऑफिसवर धमाका करणार असल्याची चर्चा आहे.
-
ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चाहत्यांना ‘आरआरआर’ चित्रपटाबद्दल उत्सुकता होती.
-
करोना संकंटामुळे अनेकदा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.
-
अखेर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
‘आरआरआर’ हा बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटाची स्टारकास्टही तगडी आहे.
-
दाक्षिणात्य अभिनेता राम चरण या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.
-
‘अल्लूरी सीताराम राजू’ हे पात्र साकारताना तो दिसणार आहे.
-
‘आरआरआर’ चित्रपटासाठी राम चरणने ४५ करोड रुपये मानधन घेतलं आहे.
-
राम चरणसोबत अभिनेता ज्यूनिअर एनटीआरही चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे.
-
चित्रपटात ज्यूनिअर एनटीआरने कोमाराम भीम हे पात्र साकारलं आहे.
-
या भूमिकेसाठी त्याने ४५ करोड रुपये मानधन घेतल्याची माहिती आहे.
-
‘आरआरआर’ चित्रपटात बॉलिवूड कलाकारही झळकले आहेत.
-
अभिनेता अजय देवगण पहिल्यांदाच दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार आहे.
-
या चित्रपटासाठी त्याने २५ कोटी रूपये मानधन घेतलं आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट देखील या चित्रपटात महत्त्वाचं पात्र साकारताना दिसणार आहे.
-
प्रेक्षकांना पुन्हा एकदा आलियाच्या अभिनयाची जादू पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात आलियाने ‘सिता’ हे पात्र साकारलं आहे.
-
हे पात्र साकारण्यासाठी आलियाने ९ कोटी घेतल्याची माहिती आहे. (सर्व फोटो : आरआरआर / इन्स्टाग्राम)
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…