-
टर्किश अभिनेत्री इस्रा बिलगिच (Esra Bilgiç) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. इस्रा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
इस्राने ही ‘एर्तरुल गाजी’ (Ertuğrul) या लोकप्रिय शोमध्ये राणीची भूमिका साकारली होती.
-
सध्या इस्राला तिच्या एका जाहिरातीमुळे पाकिस्तानी नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
-
इस्रा ही ३० वर्षांची अभिनेत्री आणि मॉडेल आहे.
-
इस्राने टर्की देशातील ऑटोमन साम्राज्यावर आधारित ‘एर्तरुल गाजी’ या मालिकेत तिने राणीची भूमिका साकारली होती.
-
ही मालिका पाकिस्तानात चांगलीच गाजली. याच मालिकेतून इस्राने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
-
२०१८ साली तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण करत इस्राने ही मालिका सोडलीय
-
इस्राने हेजतेप विद्यापिठातून पुरातनशास्त्राची पदवी प्राप्त केली आहे.
-
ती सध्या लॉचं शिक्षण घेत आहे.
-
२०१७ मध्ये तिने टर्कितील फुटबॉलपटू गोखान तोरे याच्याशी लग्न केलं.
-
मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. लग्नाच्या दोन वर्षांतच तिने घटस्फोट घेतला.
-
तर इस्राने एका इनर गारमेंट कंपनीची जाहिरात केली असून या जाहिरातीत तिने ‘ब्रा’चं प्रमोशन केलं आहे. इस्राने ही जाहिरात व्हिक्टोरीया सिक्रेट या ब्रँडसाठी केली आहे.
-
इस्राने या ३६ सेकंदाच्या जाहिरातीत ब्रावर ब्लेझर परिधान करत इनर गारमेंटची जाहिरात केली आहे.
-
त्यानंतर इस्राला पाकिस्तानी नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
-
एक नेटकरी इस्राला ट्रोल करत म्हणाला, “मुस्लीमचं अशी घाणेरडी गोष्ट करत आहेत, तर इतर धर्माच्या लोकांना कशाला लाज वाटेल… तुला लाज वाटली पाहिजे…रमजानचा महिना येत आहे.”
-
दुसरा नेटकरी म्हणाला, “हलीम तुला लाज वाटली पाहिजे.”
-
तिसरा नेटकरी म्हणाला, “हलीम तू हे काय करतेस. एर्तरुल सरदारने तुझ्याशी यासाठी लग्न केले होते का?”
-
आणखी एक नेटकरी ट्रोल करत म्हणाला, “हलीम भाभी तुम्ही फार वाईट कपडे परिधान केले आहेत. एर्तरुल गाजी’ तुझी भूमिका अप्रतिम होती. तू एका चांगल्या मुस्लीम महिलेची भूमिका साकारली म्हणून तुला प्रसिद्धी मिळाली याची तुम्ही लाज बाळगा.” (All Photo Credit : Esra Bilgic and Victoria’s Secret Youtube)

मोठी बातमी! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार? केंद्र सरकारने एक्साइज ड्युटीमध्ये केली वाढ