-
सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे.
-
येत्या २७ मार्चला रात्री ८ वाजल्यापासून लॉस एंजेलिसमध्ये हा सोहळा सुरु होणार आहे. पण वेळेतील फरकामुळे भारतात सोमवारी (२८ मार्च) पहाटे ५.३० वाजल्यापासून हा सोहळा पाहता येणार आहे.
-
९४ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी हॉलिवूड अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅचची मुख्य भूमिका असलेल्या ‘द पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक १२ नामांकने मिळाली आहेत. तर ९४ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातून रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले आहे.
-
पण ऑस्करसाठी विजेत्यांची निवड नेमकी कशी होती? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. चला तर याचे उत्तर जाणून घेऊया.
-
कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते.
-
ऑस्करची ती सोनेरी बाहुली आपल्याला मिळावी यासाठी प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो. चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञांपासून ते कलाकारांपर्यंत ऑस्कर मिळवण्याकरता चढाओढ लागलेली असते.
-
ऑस्कर पुरस्कारला ‘अकादमी पुरस्कार’ या नावानेही ओळखले जाते. हा पुरस्कार अमेरिकेतील ‘अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स’ या संस्थेतर्फे प्रदान केला जातो.
-
चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्यांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
-
अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या संस्थेत ९००० हून अधिक मोशन पिक्चर व्यावसायिक आहेत. १९२७ मध्ये स्थापन झालेल्या या अकादमीचे उद्दिष्ट हे मोशन पिक्चर्सच्या कला आणि विज्ञानांची प्रगती करणे असा आहे.
-
चित्रपट उद्योगाला फायदा व्हावा आणि त्याची प्रतिमा सुधारावी यासाठी मेट्रो-गोल्डिन-मेयरचे तत्कालीन प्रमुख आणि सह-संस्थापक लुई बी. मेयर यांनी या अकादमीची संकल्पना मांडली होती.
-
लॉस एंजेलिसच्या अॅम्बेसेडर हॉटेलमध्ये हॉलिवूडमधील विविध क्रिएटिव्ह शाखेतील ३६ जणांना आमंत्रित केले गेले होते. या संकल्पनेवर विचारविनिमय झाल्यानंतर या अकादमीचा स्थापना झाली.
-
त्यावेळी हॉलिवूडमधील सर्वात मोठे स्टार आणि अकादमीचे संस्थापक सदस्य डग्लस फेअरबँक्स हे या अकादमीचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडले गेले.
-
एखाद्या चित्रपटाच्या निर्मितीच्या व्यवसायाशी संबंधित कोणताही कलाकार या अकादमीचा सदस्य असू शकतो. त्या सदस्यांना अकादमीच्या १७ शाखांपैकी एक शाखा निवडता येते.
-
दिग्दर्शक, अभिनेते, संपादक, लेखक, सिनेमॅटोग्राफर, कॉस्च्युम डिझायनर, डॉक्युमेंटरी, मेकअप आर्टिस्ट/हेअरस्टाइलिस्ट, संगीत, निर्माते, प्रोडक्शन डिझाईन, शॉर्ट फिल्म/फिचर अॅनिमेशन, ध्वनी आणि व्हिज्युअल परिणाम अशा अकादमीच्या १७ शाखा आहेत.
-
या शाखांमध्ये बसत नसलेल्यांना सामावून घेण्यासाठी Members-at-Large नावाची आणखी एक श्रेणी तयार करण्यात आली आहे.
-
ऑस्करसाठी केले जाणारे नामांकन हे कागदी किंवा ऑनलाईन मतपत्रिका वापर करुन केले जातात. एखाद्या विशिष्ट शाखेतील सदस्य त्यांच्या स्वत:च्या श्रेणीतील कलाकारांना मतदान देऊन त्याची निवड करतात. म्हणजेच एखादा अभिनेता सदस्य केवळ दुसऱ्या अभिनेत्याला नामांकित करु शकतो.
-
यात फक्त सर्वोत्कृष्ट चित्र या श्रेणीसाठी प्रत्येक अकादमी सदस्याला नॉमिनेशनसाठी निवडता येतात.
-
ही संपूर्ण प्रक्रिया प्राइसवॉटरहाऊस कूपर्सद्वारे आयोजित केली जाते. ही अकाऊंटींग फर्म ४ मोठ्या अकाउंटिंग फर्मपैकी एक आहे.
-
‘द अकॅडमी’चे जगभरात जवळपास ९००० सदस्य आहेत. त्यात भारताचे ५०च्या आसपास सदस्य आहेत. यामध्ये अर्ध्याहून जास्त सदस्यांची मतं मिळाली म्हणजे सर्वोत्कृष्ट सिनेमाचा ऑस्कर पुरस्कार मिळतो. ही मतं मिळवण्याची प्रक्रियाही तितकीच रंजक असते.
-
इथल्या प्रत्येक सदस्यापर्यंत आपला चित्रपट पोहोचवावा लागतो. त्यासाठी एक एजंट नेमावा लागतो. त्यानंतर चित्रपटाबरोबरच जागतिक मूल्य असावी लागतात. हा सर्व फिल्म मॅनेजमेन्ट तसेच चित्रपट व्यवस्थापनाचा भाग आहे.
-
नामांकित व्यक्तींमधून विजेते निवडण्याची पद्धत जास्त सोपे आहेत. नामांकन दाखल झाल्यावर सर्व श्रेणी अकादमीच्या सदस्यांसाठी खुल्या होतात.
-
ते सर्व श्रेणींमध्ये मतदान करू शकतात. ऑस्कर समारंभात तो Envelope उघडेपर्यंत फक्त प्राइस वॉटर हाऊस कूपर्सला विजेत्यांबद्दल माहिती असते. त्यापलीकडे याची माहिती कोणालाही दिले जात नाही.
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन