-
दाक्षिणात्य दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांचा बहुचर्चित ‘आरआरआर’ चित्रपट २५ मार्चला सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)
-
ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होती. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)
-
चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्याच दिवशी १८ कोटी तर तेलगू राज्यांमध्ये या चित्रपटाने सगळे रेकॉर्ड मोडले असून १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)
-
हा चित्रपट अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढणार असल्याचा अंदाज आहे. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)
-
दाक्षिणात्य दिग्दर्शक राजमौली हे बिग बजेट चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)
-
याआधीही त्यांच्या ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्डस मोडले होते. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)
-
परंतु ‘आरआरआर’ आणि ‘बाहुबली’ याव्यतिरिक्तही राजमौलींचे असे अनेक चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)
-
बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करणाऱ्या राजमौलींच्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊया. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)
-
२०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने चाहत्यांना अक्षरश: वेडं करून सोडलं होतं. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)
-
अभिनेता प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)
-
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ६५० करोड रुपयांचा गल्ला जमवला होता. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)
-
‘कट्टपाने बाहुबली को क्यूँ मारा?’ हा एकच प्रश्न घेऊन प्रेक्षक ‘बाहुबली २’च्या प्रतीक्षेत चित्रपटगृहांतून बाहेर पडत होते. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)
-
या प्रश्नाचं उत्तर घेऊन राजमौलींनी ‘बाहुबली २’ चित्रपटाद्वारे २०१७ मध्ये पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका केला. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)
-
‘बाहुबली २’ चित्रपटाने तब्बल १ हजार ८०० कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्डस मोडीत काढले. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)
-
बॉक्स ऑफिसवर १ हजार कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा ‘बाहुबली २’ हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)
-
‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ या चित्रपटांना पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)
-
राजमौलींचा ‘यमडोंगा’ हा तेलुगू भाषेतील चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. (फोटो : आयएमडीबी)
-
या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता ज्यूनिअर एनटीआरने मुख्य भूमिका साकारली होती.(फोटो : आयएमडीबी)
-
बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने २९ कोटींची कमाई केली होती. (फोटो : आयएमडीबी)
-
२००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘मागधीरा’ या तेलुगू चित्रपटाने १५० करोड रुपयांची कमाई केली होती. (फोटो : आयएमडीबी)
-
अभिनेता राम चरण आणि अभिनेत्री काजल अग्रवाल या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. (फोटो : आयएमडीबी)
-
राजमौलींच्या या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. (फोटो : आयएमडीबी)
-
२०१२ साली प्रदर्शित झालेला हिंदीमधील ‘मक्खी’ हा चित्रपट तुम्ही पहिला असेलच. (फोटो : आयएमडीबी)
-
राजमौलींचा हा चित्रपट तेलुगू भाषेत ‘इगा’ या नावाने प्रदर्शित करण्यात आला होता. (फोटो : आयएमडीबी)
-
दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. (फोटो : आयएमडीबी)
-
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १३० करोड रुपयांचा गल्ला जमवला होता. (फोटो : आयएमडीबी)
-
राजमौलींच्या या चित्रपटाला देखील दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. (फोटो : आयएमडीबी)
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…