-
सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या यंदाच्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
-
यावेळी ऑस्करच्या मंचावर जे काही झाले ते कोणालाही अपेक्षित नव्हते. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा अभिनेता विल स्मिथ सुत्रसंचालक क्रिस रॉकवर अचानक चिडला आणि त्याने स्टेजवर जाऊन कानशिलात लगावली आहे.
-
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत क्रिस रॉक हा विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवत असल्याचे दिसते. दरम्यान, विल स्मिथ स्टेवर गेला आणि त्याने क्रिसला कानशिलात लगावली
-
त्यानंतर तो त्याच्या जागेवर येऊन म्हणाला, “माझ्या पत्नीचे नाव पुन्हा तुझ्या तोंडाने घेऊ नकोस.” यावर उत्तर देत क्रिस म्हणाला, “तो पुन्हा असं करणार नाही.”
-
ही घटना घडल्यानंतर विल स्मिथला बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड मिळाला, तेव्हा त्याने यासाठी माफी मागितली.
-
संपूर्ण कार्यक्रम संपल्यानंतर क्रिसने विलच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल करण्यास नकार दिला. आता विल स्मिथने कानशिलात लगावलेला क्रिस कोण आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
-
क्रिस हा एक स्टॅन्ड-अप कॉमेडियन, अभिनेता, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. क्रिसला खरी ओळख ही १९९० साली प्रदर्शित झालेल्या नाइट लाइव शोमधून मिळाली.
-
क्रिसने डाइन टू अर्थ, हेड ऑफ स्टेट, द लॉन्गेस्ट यार्ड, द मैडागास्कर चित्रपटाची सीरिज, ग्रोन अप्स, ग्रोन अप्स २, टॉप फाइव्ह सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
क्रिसने सुत्रसंचालन केलेला ९४ वा ऑस्कर अवॉर्ड हा पहिला शो नाही. या आधी त्याने २००४ आणि २०१५ मध्ये अकादमी अवॉर्डचे सुत्रसंचालन केले होते. त्याला ४ एमी अवॉर्ड आणि तीन ग्रॅमी अवॉर्ड खिताब देखील मिळाले आहेत.
-
कॉमेडिच्या जगात क्रिसला सगळेच ओळखतात. क्रिसच्या कुटुंबाच्या इतिहासाविषयी २००८ मध्ये PBS सीरिजवर ‘अक्रीकन अमेरिकन लाइव्स २’ मध्ये दाखवण्यात आले आहे.
-
क्रिसला त्याच्या रंगामुळे शाळेत असताना त्याच्यावर गुंडगीरी करत होते. एकदिवस या सगळ्याला कंटाळून त्याच्या आई-वडिलांनी त्याला शाळेतून काढले. क्रिस अभ्यासात हुशार होता.
-
क्रिसने १९८४ मध्ये स्टॅन्डप कॉमेडियन म्हणून करिअर सुरु केले होते. त्याचा पहिला शो हा न्यूयॉर्कमध्ये झाला होता.
-
त्यानंतर त्याने अनेक टीव्ही शो, सीरिज, चित्रपटांमध्ये काम केले.
-
क्रिस रॉकने १९९६ मध्ये Compton Rock शी लग्न केले. त्यांना २ मुली आहेत.
-
डिसेंबर २०१४ मध्ये क्रिस आणि Compton Rock चा घटस्फोट घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. त्यानंतर क्रिसने पॉर्नोग्राफीचे अॅडिक्शन असल्याचे स्विकारले आणि २०१६ मध्ये ते दोघे विभक्त झाले. (Photo Credit : Reuters/ AP Photo/Chris Pizzello/ Chris Rock)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख