-
दाक्षिणात्य दिग्दर्शक एसएस राजामौली हे चित्रपट विश्वातील एक मोठे नाव बनले आहे.
-
बाहुबली आणि RRR सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट बनवणारे राजामौली देशातील सर्वात महागडे दिग्दर्शक आहेत.
-
सुपरहिट चित्रपट बनवणाऱ्या राजामौली यांचे वैयक्तिक आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणेच आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल…
-
राजामौली यांच्या पत्नीचे नाव रमा आहे. रमा या व्यवसायाने कॉस्च्युम डिझायनर आहे.
-
रमा यांनी राजामौलींच्या बाहुबली आणि नुकत्याच आलेल्या RRR सारख्या चित्रपटांसाठी कॉस्च्युम डिझाइन केले आहेत.
-
रमा आणि राजामौली यांनी २००१ मध्ये कोर्टात लग्न केले होते.
-
रमा या राजामौली यांच्यापेक्षा चार वर्षांनी मोठ्या असून राजामौली हे रमा यांचे दुसरे पती आहेत.
-
रमा यांचा २००० मध्ये पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला. रमाच्या घटस्फोटानंतर दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर रमा आणि राजामौली यांनी मुल होऊ दिलं नाही.
-
रमा आणि राजामौली आधीपासून चांगले मित्र होते.
-
पहिल्या लग्नापासून रमा यांना एसएस कार्तिकेय नावाचा मुलगा आहे. राजामौली यांनी त्यांचे नाव कार्तिकेयला दिले आहे.
-
एसएस राजामौली आणि रमा यांनी एक मुलगी दत्तक घेतली आहे. एसएस मयुखी असे मुलीचे नाव आहे.
-
राजामौली यांच्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक एमएम किरवाणी हे रमाचे मेहुणे आहेत. त्यांचं लग्न रमाची बहीण श्रीवल्ली हिच्याशी झालं.
-
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटाची बरीच चर्चा होताना दिसत आहे.
-
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करताना दिसत आहे.
-
या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, रामचरण यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची देखील मुख्य भूमिका आहे. (फोटो फेसबुक आणि इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’