-
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि त्याचे कुटुंबीय सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
-
त्याची मोठी मुलगी सारा अली खान आणि इब्राहिम हे त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.
-
गेल्या काही दिवसांपासून सैफचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान हा सोशल मीडियावर अनेक कारणांमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
इब्राहिम हा गेल्या काही महिन्यांपासून छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
-
काही महिन्यांपूर्वी ते दोघेजण एका डिनर डेटवर गेल्याचे पाहायला मिळत होते.
-
त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
दरम्यान ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आहे.
-
सैफचा लाडका मुलगा इब्राहिम अली खान हा पलक तिवारीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोललं जात आहे.
-
त्या दोघांचे डिनर डेटवर जाताना, एकत्र फिरतानाचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसतात.
-
मात्र या दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
-
पण आता ते दोघेही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.
-
काही दिवसांपूर्वीच इब्राहिम हा वरुण धवन आणि अनन्या पांडे यांच्यासोबत करण जौहरच्या ऑफिसबाहेर दिसला होता. त्यामुळे लवकरच तो बॉलिवूडमध्ये झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे.
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच