-
बॉलिवूडमधील कलाकारांचे आयुष्य, शिक्षण हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे.
-
शिक्षण पूर्ण करून अभिनयाची वाट धरलेले अनेक सेलिब्रिटी बॉलिवूडमध्ये आहेत.
-
पण आज आपण अशा कलाकरांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी अभिनयासाठी शिक्षण अर्धवट सोडले.
-
सलमान खान : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने मुंबईत शालेय शिक्षण पूर्ण केले.
-
सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये त्याने पुढील शिक्षणासाठी अॅडमिशन घेतले होते.
-
परंतु नंतर काही कारणांमुळे तो शिक्षण पूर्ण करू शकला नाही.
-
दीपिका पदुकोण : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने डिग्री पर्यंतचे शिक्षण देखील पूर्ण केलेले नाही.
-
अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी तिने अर्धवटच शिक्षण सोडले.
-
आलिया भट्ट : विविध भूमिका साकारून आलियाने तिच्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
-
आलियाने बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी बारावीनंतर पुढचे शिक्षण घेतले नाही.
-
प्रियांका चोप्रा : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने बारावी पर्यंतच शिक्षण घेतलं आहे.
-
२०१२ मध्ये ‘मिस वर्ल्ड’ हा किताब जिंकल्यानंतर मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रियंकाने पुढील शिक्षण घेतले नाही.
-
ऐश्वर्या राय बच्चन : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करते.
-
ऐश्वर्या एक हुशार विद्यार्थिनी होती. परंतु अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी तिने आर्किटेक्चरचं शिक्षण अर्धवट सोडलं.
-
रणबीर कपूर : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने देखील डिग्रीचे शिक्षण अर्धवट सोडले.
-
‘सावरिया’ या चित्रपटाची ऑफर आल्यानंतर रणबीरने पुढचे शिक्षण घेतले नाही.
-
शाहरुख खान : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत.
-
त्याचं अभिनयावरील प्रेम पाहून चाहते देखील भारावून जातात.
-
अभिनय क्षेत्रात करिअर कारण्यासाठी शाहरुख खानने देखील अर्धवटच शिक्षण सोडलं.
-
डिग्री नंतरचे शिक्षण शाहरुखने घेतलेले नाही.
-
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख