-
दाक्षिणात्य रॉकिंग स्टार यश मुख्य भूमिकेत असलेला ‘केजीएफ २’ हा चित्रपट १५ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
‘केजीएफ’ या २०१८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.
-
रॉकिंग स्टार यश या चित्रपटात ‘रॉकी भाई’ हे पात्र साकारणार आहे.
-
अॅक्शन सीन्सचा थरार असणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरलाही चाहत्यांनी पसंती दर्शविली.
-
यश हा आघाडीच्या दाक्षिणात्य अभिनेत्यांपैकी एक आहे.
-
२००८ साली ‘मोगीना मनसु’ या चित्रपटातून यशने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
-
या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली होती.
-
यशने अभिनेत्री राधिका पंडित सोबत २०१६ साली लग्नगाठ बांधली.
-
या दोघांना आयरा आणि याथर्व ही दोन मुले आहेत.
-
यश आणि त्याचे कुटुंब.
-
यश आपल्या कुटुंबासोबत बंगळुरू येथे असलेल्या आलिशान बंगल्यात राहतो.
-
या बंगल्याची किंमत चार करोड रुपये इतकी आहे.
-
‘केजीएफ’ चित्रपटाच्या यशानंतर हा बंगला यशने खरेदी केल्याची माहिती आहे.
-
अभिनयाप्रमाणेच यशची लाइफस्टाइलही रॉकिंग आहे.
-
कुटुंबासोबत मालदीवमध्ये खास क्षण एन्जॉय करताना.
-
यश एका वर्षात सुमारे पाच कोटी रुपयांची कमाई करतो.
-
एका रिपोर्ट्सनुसार त्याच्या वार्षिक उत्पन्नात दर वर्षी ३० टक्क्यांनी वाढ होत असल्याचा अंदाज आहे.
-
यशकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे.
-
मर्सिडीज बेन्झ जीएलएस ३५० डी, मर्सिडीज बेन्झ जीएलसी २५० डी, रेंज रोव्हर, ऑडी क्यू ७ या लक्झरी गाड्या आहेत.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार यशची एकूण संपत्ती पाच मिलियन डॉलर इतकी आहे.
-
भारतीय रुपयानुसार जवळपास ४० कोटी रुपये इतकी त्याची संपत्ती आहे.
-
तर त्याची पत्नी सुमारे ११.९ कोटी रुपये संपत्तीची मालकीण आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यश आणि त्याची पत्नी या दोघांची एकूण संपत्ती ५१.९ कोटी रुपये इतकी आहे.
-
(सर्व फोटो : यश/ इन्स्टाग्राम)

५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?