-
दाक्षिणात्य अभिनेता यश मुख्य भूमिकेत असलेला ‘केजीएफ २’ हा चित्रपट १४ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
-
२०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.
-
‘केजीएफ’ नंतर ‘केजीएफ २’च्या प्रतीक्षेत प्रेक्षक होते. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
अॅक्शन सीन्सचा थरार असणाऱ्या या चित्रपटातील यशने साकारलेली ‘रॉकी भाई’ची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
-
‘रॉकी भाई’ला जगातील सर्वात श्रीमंत आणि ताकदवान व्यक्ती बनवण्याचे त्याच्या आईचे स्वप्न होते.
-
आईला दिलेले वाचन पूर्ण करण्यासाठी ‘रॉकी भाई’ने जो मार्ग निवडला आहे तिथे त्याला अनेक विरोधक भेटणार आहेत.
-
रॉकी भाईच्या विरोधात असलेली हिच पात्र ‘केजीएफ २’ चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
-
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त या चित्रपटात अधिरा ही खलनायकाची भूमिका साकारणार आहे.
-
‘केजीएफ’मध्ये रॉकी भाईकडून हत्या करण्यात आलेल्या ‘गरुडा’च्या काकाच्या भूमिकेत तो दिसणार आहे.
-
‘केजीएफ’ चित्रपटात रॉकी भाईची कहाणी सांगणाऱ्या विजेंद्र इंगलागी ही भूमिका अभिनेता आनंद नेगी यांनी साकारली होती.
-
‘केजीएफ २’ मध्ये मात्र ही भूमिका अभिनेता प्रकाश राज साकारताना दिसतील.
-
अभिनेता राव रमेश या चित्रपटात सीबीआय ऑफिसर राघवन हे पात्र साकारणार आहेत.
-
जगातील सर्वात श्रीमंत आणि ताकदवान व्यक्ती होण्याची स्वप्न पाहणाऱ्या रॉकी भाईला पकडणे हे त्यांचे मुख्य उद्दीष्ट असणार आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन देखील या चित्रपटात झळकणार आहे.
-
या चित्रपटात ती देशाच्या पंतप्रधानाच्या भूमिकेत आहे. ‘रामिका सेन’ हे पात्र साकारताना ती दिसेल. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?