-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
-
महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम फार लोकप्रिय म्हणून ओळखला जातो.
-
या कार्यक्रमातील समीर चौगुले, विशाखा सुभेदार, निखिल बने, नम्रता संभेराव यासारखे अनेक विनोदवीरांचे निखळ मनोरंजन करत आहेत.
-
आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसायला लावणारी अभिनेत्री म्हणून अभिनेत्री विशाखा सुभेदारला ओळखले जाते.
-
काही दिवसांपूर्वीच विशाखा सुभेदारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला.
-
या पार्श्वभूमीवर विशाखा सुभेदारने एक पोस्ट शेअर केली होती. यात तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रमातून निरोप घेतल्याचे तिने सांगितले होते.
-
नुकतंच ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या एका मुलाखतीत विशाखाला महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सोडल्यानंतर तू पुढे काय करणार? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तिने व्यवस्थित मुद्देशीर उत्तर दिले.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडल्यानंतर आता तू काय करणार आहेस?’ या प्रश्नावर उत्तर देताना विशाखा म्हणाली, “सध्या माझं नाटक सुरु आहे. मी जरी अनेक स्किटमध्ये काम करत असली तरी माझे नाटक हे सुरुच असते.”
-
“नाटक हे कलाकारांना कायम फ्रेश ठेवते. त्यामुळे मला ताण तणाव आला नाही”, असेही ती म्हणाली.
-
“पण गेल्या तीन वर्षात लॉकडाऊन त्यात विचित्र वातावरण तसेच पुन्हा ४० दिवस घरापासून लांब राहिलो, त्यामुळे सातत्याने आपण तेच काम करतोय असं मनात वाटायला लागलं होतं”, असे तिने म्हटले.
-
“गेले ८ ते १० वर्षे मी तेच तेच करते. त्यामुळे हा निर्णय घेतला. कामातून थोडा ब्रेक घ्यावा, थोडं थांबावं असं वाटत होते. कारण तीन वर्ष नाटक बंद असल्याने माझी ती भूक भागत नव्हती”, असेही ती म्हणाली.
-
“पण आता मी निर्मित केलेले ‘कुररर’ नावाचं नाटक रंगमंचावर सुरु झालं आहे”, असेही विशाखा म्हणाली.
-
“या नाटकाचे लेखन प्रसाद खांडेकरने केले आहे. त्यात नम्रता संभेराव, पॅडी कांबळे हे देखील आहेत. ते एक वेगळ्या धाटणीचे नाटक आहे”, असेही तिने म्हटले.
-
“त्याची निर्मिती मी केल्याने माझ्या खांद्यावर ती जबाबदारी आहे. त्यामुळे काम सतत चालू आहे. ते कुठेही थांबलेले नाही”, असेही तिने स्पष्टीकरण दिले.
-
त्यापुढे विशाखा म्हणाली, “गेली १० वर्ष मी तेच तेच करतेय, असं मला वाटतं होतं. त्यामुळे आता एखादं छानसे पात्र साकारावं, अशी माझी इच्छा आहे. गेले अनेक दिवस चांगले चित्रपट प्रदर्शित होत आहे. काहींची निर्मिती सुरु आहे.”
-
“विविध विषयांवर, वेगळ्या धाटणीचे चित्रपट साकारले जात आहेत. त्यात काहीतरी चांगले काम करायला मिळेल, अशी एक इच्छा मनात आहे”, अशी इच्छाही तिने बोलून दाखवली.
-
“तसेच विविध मालिका येत आहेत. त्यातही काम करण्याची इच्छा आहे. मालिका किंवा चित्रपटात एखादे पात्र वर्ष, दीड वर्ष करता येते. त्यातील पात्र आपल्याला जगता येतात, त्यामधील बारकावे समजतात. त्या पात्राच्या नावाने आपल्याला ओळखले जाते”, असेही ती म्हणाली.
-
“आता विशाखा सुभेदार, विशाखा सुभेदार हे खूप झालंय. त्यामुळे मला आता एखाद्या पात्राच्या नावाने ओळखलं जावं, असं वाटत आहे. प्रत्येक कलाकाराला फेम, नाव हे हवंच असते. पण त्या मालिकेतील पात्राच्या नावाने ओळख व्हावी” असेही मला आवर्जून वाटते.
-
“गेल्या ७ ते ८ वर्षांपासून माझी ती ओळख राहिली आहे. विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर मला काम करावं असंही वाटतंय”, असेही तिने म्हटले.
-
“सध्या अभिनयाची एक वेगळी दुनिया मला खुणावत आहे. एका वेगळ्या प्रकारात काम करावं, अशी माझी इच्छा आहे”, असेही ती म्हणाली.
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO