-
इंडियन प्रीमियर लीगचा (IPL)चा १५वा हंगाम सुरु आहे. आयपीएल मधील प्रत्येक खेळाडू हा एखाद्या स्टार पेक्षा कमी नाही. विराट कोहली पासून ते रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे सर्वचजण नेहमी चर्चेत असतात. पण पाश्चात्य क्रीडा जगतात क्रीडापटूंच्या मैत्रिणी किंवा पत्नी विशेष लोकप्रिय असतात. तर चला जाणून घेऊया आयपीएल मधील क्रिकेट संघातील खेळाडूंच्या लोकप्रिय असलेल्या पत्नींविषयी…
-
विराट कोहलीच्या पत्नीला परिचयाची गरज नाही, कारण ती भारतातील सर्वात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे. अनुष्का आणि विराट २०१७ मध्ये इटलीमध्ये या दोघांनी लग्न केलं. (Photo Credi : Anushka Sharma Instagram)
-
विनी रमन ही मेलबर्नमधील तामिळ कुटुंबातील असून ती व्यवसायाने फार्मासिस्ट आहे. २०१३ मध्ये एका कार्यक्रमात तिची मॅक्सवेलशी भेट झाली आणि दोघांनी नुकतेच एकमेकांशी लग्न केले. विनी रमन तिच्या पतीसह भारतात आली आणि तिने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) जर्सी घातल्याचा फोटो देखील शेअर केला होता. (Photo Credi : Vini Raman Instagram)
-
संजना गणेशन एक प्रसिद्ध टेलिव्हिजन व्यक्तिमत्व आणि सुत्रसंचालक आहे. बुमराहशी लग्न करण्यापूर्वी, संजनाने ‘फेमिना ऑफिशियल गॉर्जियस’ खिताब जिंकला होता आणि २०१४ मध्ये एमटीव्हीच्या स्प्लिट्सविला सीझन ७ मध्ये भाग घेतला होता. मार्च २०२१ मध्ये बुमराहसोबत तिचे लग्न झाले. (Photo Credi : Sanjana Ganesan Instagram)
-
नताशा स्टॅनकोविकने हार्दिक पांड्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सर्बियन सुंदरीने बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. जुलै २०२० मध्ये या जोडप्याला अगस्त्य नावाचा मुलगा झाला. (Photo Credi : Nataša Stanković Pandya Instagram)
-
युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री अलीकडेच आरसीबी विरुद्ध आरआर सामन्यात आपल्या पतीसाठी चीअर करताना दिसली. ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. सोशल मीडियावर धनश्री सक्रिय असल्याचे दिसते. तिचे डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. याशिवाय धनश्री एक प्रशिक्षित डेंटिस्ट देखील आहे. (Photo Credi : Dhanashree Verma Chahal Instagram)
![Cm Devendra Fadnavis Statement About Suresh Dhas](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Suresh-DF-1.jpg?w=300&h=200&crop=1)
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सुरेश धस आधुनिक भगीरथ एकदा मागे लागले की डोकं खाऊन….”